यश आणि अंतर्मन

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्ट्रॉग इमोशन, स्ट्रॉग बिलीफ सिस्टीम, प्रचंड सकारात्मकता, एकाग्रता व आत्मविश्वास इ. गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. आपल्याला बऱ्याचवेळा असं दिसून येत की, जे यशस्वी आहेत, त्यांच्यापेक्षाही अधिक काबील लोक जगामध्ये आहेत. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. आजच ताज उदाहरण पाहू, नेहा ककड इंडियन आयडॉल स्पर्धेत जिंकू शकली नाही. टॉप आठ राउंडच्या आतच ती त्यातून बाहेर पडली. परंतु ती आज स्टार झाली आहे. परंतु तीच स्पर्धा जिंकणारा नेहा ककड सारखं यश संपादन करू शकला नाही. सुपरस्टार अक्षय कुमार एका मुलाखती दरम्यान म्हटले की, ‘मैं इंडस्ट्रो मे देखता हू की. हमसे भी काबील कलाकार है, जो अभी भी स्ट्रगल कर रहे है’। मी बारावी कक्षेत असताना सुध्दा आमचे क्लास टीचर बिराजदार सरांनी एक किस्सा सांगितला होता की, ‘आमच्या वर्गात आमच्या पेक्षाही खुप हुशार विदयाधी होता. परंतु त्याला अजूनही नौकरी लागली नाही’. जेव्हा व्यक्ती पराकोटीचे प्रयत्न करतो. अन तरीही त्याला यश मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘माझ्या नशिबातच नव्हतं आणि इतर ही म्हणतात की, त्याच्या नशिबीच नव्हते. परंतु त्यात नशिबाचा भाग नसून, आपलं जीवन म्हणजे आपल्याच अंतर्मनातील धारणा व भावनांचा परीपाक असतो. कळत न कळत. जीवनाशी संघर्ष करता-करता आपल्या अंतर्मनात विकसीत होणारी धारणाच आपलं भवितव्य निर्धारीत करीत असते. अर्थात तुमचं नशीब तुमच्या अंतर्मनातील धारणे, बिलीफ सिस्टीम व भावनेमध्ये असते..

जीवनातील एक रहस्य समजून घ्या की, तुमच्या मनातील विचारांना धारणा व भावनेची साथ न मिळाल्यास, तुमच्या जीवनावर अपेक्षीत परीणाम कधीच साधू शकत नसतात. परंतु तुमच्या मनातील धारणा व भावना याच तुमच्या जीवनाचं गमक बनत असतात. आपल्याला वाटतं की, आपण आणि जग वेगळं आहे. तू आणि मी अलग आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा आंतरीक स्वख्यात उर्जेच्या रूमाने एकमेकासोबत जोडलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातील धारणा व भावनांची देवाणघेवाण रोज मना-मनाव्दारे होत असते. तुमच्या जीवनात कोण येणार? कोण जाणार? कधी आणि केव्हा काय होणार? हे तुमच्या अंतर्मनातील धारणे (बिलीफ सिस्टीम) वर अवलंबून असते. यालाच आजकाल आकर्षणाचा सिध्दांत म्हणतात. आकर्षणाचा सिंध्दात हा काही अंधश्रध्देचा भाग नसून त्यास आधुनिक विज्ञान क्वांटम फिजीक्सचा आधार आहे.

तुमच्या संपर्कात येणारे नकारात्मक लोक, तुमच्या जीवनात येणारे नकारात्मक प्रसंग-घटना, नकारात्मक अनुभव, हा सर्व प्रभाव तुमच्या अंतर्मनातील धारणा व भावनांचा खेळ असतो. संमोहन उपचाराब्दारे तुमच्या अंतर्मनातील धारणा व भावना प्रचंड सकारात्मक उर्जात्मक बनवता येते. ज्यामुळे तुमच्या जीवनातील भौतिक भागामध्ये सुध्दा बदल होण्यास सुरुवात होतात. संमोहनाव्दारे तुमच्या अंतर्मनात प्रचंड आत्मविश्वास, एकाग्रता, सकारात्मकता, धैर्य, मनोबल, जिदद, उत्साह, चिकाटी, स्थिरता, आत्मनियंत्रण प्रस्थापीत करता येतं. ज्यामुळे आपल्या जीवनातील प्रगती गतिमान बनते, लक्षात ठेवा, ज्याचं अंतर्मन उर्जात्मक स्वस्याच घडलेल असत. सर्व जग त्याच्यासाठी गुलामासारख काम करत. आता आपण अपयशी जीवनाचा भाग बनून नशिबाला दोष देत बसायचं, की यशाला आपल्या जीवनाच भाग बनवून, आपलं नशिब आपणच घडवायच? हे आपणच ठरवायच आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अतः दीप भवः, नशीब तुझ्याच हातात… अशी बरीच प्रेरणात्मक वाक्य आपण ऐकतो. या सर्व वाक्यांच मुळ रहस्य तुमच्या अंतर्मनात आहे. आपल्या अंतर्मनातील धारणा बदला, तुमचं नशिब बदलायला वेळ लागणार नाही.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×