कंपनी / संस्थांसाठी नवसंजीवनी
कंपनी/संस्थांमधील कर्मचारी /अधिकारी यांच्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे कंपनी / संस्थेची कार्यक्षमता कमी होत असते. उदा. पगार मिळावा यासाठी कामावर यायचं, कामाचे तास भरावेत म्हणून कामावर थांबायचं. कामाची वेळ संपली की लगेच घरी निघायचं. काम पूर्ण झालय का नाही झाल? हे ते पाहत नाहीत. कंपनी/संस्था फायदयात जाओ अथवा तोट्यात जाओ, याच्याशी त्यांना काहीही घेण देण नाही. त्यांना फक्त पगाराशी मतलब। या अशा नकारात्मक मानसीकतेमुळे कंपनी / संस्थेची कार्यक्षमता कमी-कमी होत जाते. प्रोफीट कमी-कमीत जातं. कंपनी / संस्था ताटायात जावू लागते. कंपनी/संस्था वेळेवर पगार देउ शकत नाही. बोनस देउ शकत नाही. कर्मचार्यांमध्ये गैरसमज व असंतोष वाढतो. कर्मचारी हाडताळ वर बसतात. आंदोलन करतात. कंपनी/संस्थेला टाळा लागतो, तो कायमचाच। मग कर्मचारी बेरोजगार होतात. त्यांची मुलं बाळ रस्त्यावर येतात. पण आता पश्चाताप करून काय फायदा? वेळ निघून गेलेली असते. उद्योजक मित्र हो, व्यक्ति हा त्याच्या मनात जशा भावना निर्माण होतात. तसाच वागत असतो. जर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना सकारात्मक बनवू शकला तर तुम्ही त्यांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करु शकतो. सर्व कर्मचार्यांच्या नकारात्मक दृष्टीकोनाचाच परीणाम असतो. याच नकारात्मक दृष्टीकोनाचा दुसरा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे, कर्मचार्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. नकारात्मकता व मनापासून काम न केल्यामुळे कर्मचार्यांच्या मनामध्ये ताण निर्माण होत राहतो. मनाला आवडेल ते काम केल्यावर व्यक्तीच्या मनावर कधीच ताण येत नाही. परंतु मनाला जे आवडत नाही, ते काम केल्यावर, पर्याय नाही म्हणून केल्यावर, गरजेपोटी केल्यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये साहजीकच ताण निर्माण होतो. दहा मिनीट जरी मनाविस्थ्द काम केलं तरी व्यक्तीच्या मनावर ताण निर्माण होतो. ताणामुळे शरीरात अॅड्रेनॅलिन, कॉटीसॉल, स्टीराईड, कोलेस्टेरॉल इं. रासायनीक द्रव्याचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे व्यक्तीच्या विविध मानसीक व शारीरीक समस्या वाढत जातात. असे आजार गोळया औषधाने बरे होत नाहीत. अशा विविध मानसीक व शारीरीक समस्यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता कमी होत जाते. एकूणच कंपनी / संस्थेची कार्यक्षमता सुध्दा कमी होत जाते.
कंपनी/संस्थेची क्वालिटी (गुणवत्ता) वाढण्यासाठी, कंपनी/संस्थेचं एक ग्रॅन्ड निर्माण होण्यासाठी, कंपनी/संस्थेची प्रगती गतिमान होण्यासाठी व अपेक्षीत उंची गाठण्यासाठी, कर्मचार्याच्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी, कंपनी / संस्थेचे कर्मचारी सकारात्मक असणं गरजेचं असतं. मालक- चालक कर्मचारी यांच्यामध्ये एकत्मता निमर्माण होणं, गरजेची आहे. मालक-चालकाच्या ध्येयाशी कर्मचाऱ्यांमध्ये समरसता निर्माण होणं गरजेचं आहे. तेव्हाच कंपनी/संस्थेच्या अपेक्षीत यशाची आपण अपेक्षा करूशकतो.
अहो, इंग्लंड हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रापेक्षाही छोटा. परंतु भारतासारख्या अनेक बलाढ्य देशावर त्याने राज्य केलं. कशाच्या जोरावर? ‘ही कंपनी माझी आहे. मी हया कंपनीचा आहे. या कंपनीच्या हितातच माझं हित दडलेलं आहे. मी अगदी प्रामाणीकपणे काम करत जाईन. वरीष्ठांच्या सुचनांचे पालन करीत जाईन. मी माझ्या कर्तव्यात कसलीही कसर ठेवणार नाही.’ अशा सकारात्मक व आत्मसमर्पणाच्या भावना दुसरं काय ? मित्र हो, छोट्यात छोटी कंपनी मोठी होऊ शकते. जास्त नफा कमावू शकतो. आपलं साम्राज्य वाढवू शकतो. परंतु केव्हा त्या कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या मनात पुढील भावना असेल की, ‘ही कंपनी/संस्था माझी आहे, मी या कंपनीचा आहे. ही कंपनीच मला रोजीरोटी देते. या कंपनीच्या उज्वल भवितव्यातच माझं व माझ्या कुटुंबाच भवितव्य सामावलेलं आहे. मी अगदी वेळेवर कामावर येत जाईन, अगदी मनापासून व प्रामाणिकपणे मी माझं प्रत्येक काम वेळेवर पुर्ण करत जाईन, वरीष्ठांच्या सुचनांच पालन करीत जाईन. या कंपनीला/संस्थेला यशाच्या उच्च शिखरावर नेण्यात मी माझही मोलाचं योगदान देईन’ अशा सकारात्मक व समर्पणाच्या भावना कर्मचार्याच्या मनात निर्माण झाल्या तर कंपनी/संस्थेची कार्यक्षमता वाढत वाढत जाते. कंपनी/संस्था गतिमान होते. कंपनी नवनवीन रेकॉर्ड बनवित जाते. कंपनी/संस्था मार्केटमध्ये स्वतःचा एक बन्ड निर्माण करते. आणि टिकवूनही ठेवते. सोबतच कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सुधारते. त्यांची कार्यक्षमता सुधारते.
उद्योजक मित्र हो, जपान मधील औद्योगिक मानसशास्त्र या संस्थेत मध्यम वयाच्या सहा कारखानदारांना हिप्नोटिझम करुन योग्य, सुचना दिल्या गेल्या. नंतर ते कारखानदार न चिडता (तणावमुक्त), एकाग्रतेने चांगले काम करताना दिसले. त्यांची कार्यक्षमता वाढलेली आढळून आली. जपान मध्ये हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्यामुळे, अनेक संमोहन तज्ञांना या संस्थेमार्फत विविध कंपन्या / संस्थांमध्ये सेल्फ हिप्नोसिस तंत्र शिकवण्यासाठी पाठवले जाते. सेल्फ हिप्नोसिस चा नियमित, योग्य पद्धतीने उपयोग करणाऱ्या व्यक्तीचे इतरांच्या मानाने चित्त अधिक एकाग्र राहतं, भिती नकारात्मकता नाहीशी होती, स्मरणशक्ती व कार्यक्षमता वाढते. इ. याच कारणांमुळे जपानमध्ये शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा हिप्नोसिस टेकनीक्स सरीस बापर होताना दिसून येतो.
याच कारणांमुळे अनेक एचआरडी कर्मचार्यासाठी एनएलपी, सिध्द समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हींग, हॅप्पी थॉटस, मेडीटेशन इ. कार्यशाळा आयोजीत करतात. परंतु वरील कार्यशाळा कर्मचार्याच्या अंतर्मनाशी संपर्क न साधू शकल्यामुळे, त्यांच्या धारणेमध्ये अपेक्षित बदल न करू शकल्यामुळे, कंपनी/संस्थेला अपेक्षीत परीणाम पाहण्यास मिळत नाहीत. कर्मचार्यांना अशा कार्यशाळांमुळे तात्पुरत चार्जिंग झाल्यासारखं वाटतं. परंतु चार दिवसातच ती चार्जग व सकारात्मकता उतरून जाते. आणि पुन्हा मागचे तेच दिवस पुढे. ना कर्मचार्यांच्या मानसीकतेत बदल होतो, ना धारणेत बदल होतो, ना भावनेत बदल होता, ना दृष्टीकोनात बदल होतो. चार दिवसानंतर संगळं जसच्या तसचं ! कर्मचार्यामध्ये कायमचा बदल होण्यासाठी त्यांच्या धारणेत भावनेत त्यांच्या दृष्टीकोनात बदल होणं गरजेच आहे. आमच्या आयुष हिप्नाथरपी सेंटरच्या अंतर्गत, कर्मचार्यांसाठी घेतली जाणारी संमोहन उपचार कार्यशाळा त्यांच्या धारणेत, भावनेत दृष्टीकोनात कायमचा बदल घडवून आणते. कर्मचारी कंपनी/संस्थेशी एकरूम, समरस होउन आनंदाने काम करू लागतात. उत्साहाने ध्येयाशी एकनिष्ठ व प्रामाणिक होउन जातात. एकूणच कंपनी / संस्थेची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत वाढत जाते. अशा प्रकारे संमोहन उपचार कार्यशाळा ही कंपनी / संस्थांसाठी एक नवसंजीवनीच ठरते.