सुप्त कलागुण व त्यांचा विकास

(नृत्य, कलाकार, गायक, वादक, डायरेक्टर, संपादक, लेखक, चित्रकार, थ्रीडी एनिमेटेड. साठी)

पंचेंद्रियांच्या साहायाने संदेश प्राप्त करणे, सवयीप्रमाणे किंवा तर्कशीलपणे विचार करणं, त्यावर क्रिया-प्रतिक्रिया देणं, एवढचं काम आपलं बाहयमन करीत असतं. परंतु आपल्या क्षमता, कौशल्य, कलागुण, मानसीक सामर्थ्य, आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती, समायोजन क्षमता इ. अनेक गोष्टी या आपल्या अंतर्मनात असतात. नावीन्यता, कल्पकता, वेगळेपण, व्यापक आकलनक्षमता, दूरदृष्टी, अचूक निर्णय क्षमता, निरीक्षण क्षमता, चित्त स्थिरता. आत्मनियंत्रण, एकरूपता, समरसता जिज्ञासा, प्रभावी नेतृत्व, कणखरता, निर्भिडता इ. अशा कितीतरी क्षमता या आपल्या अंतर्मनातच असतात. आजपर्यंत कला क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी मोठं यश संपादन केले, ज्यांनी ज्यांनी इतिहास रचले. ते काय परग्रहावरून आले होते का? नाही, ते ही तुमच्या माझ्या सारखेच मनुष्य होते. त्यांच्यामध्ये जे मानसीक व शारीरीक सामर्थ्य होतं. तेच मानसीक सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त आपणास त्याचा विनियोग करता आला पाहिजे. त्यांच्या अंतरंगातील त्या क्षमता विकसीत होण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला, त्यांना जे वातावरण मिळाले, ते आपल्याला मिळेलच असे नाही. परंतु एक बाब मात्र सत्य आहे की, संघर्षाच्या काळात जे एकदम तळागाळात गेले, तेच पुन्हा स्टार बनले, यशाच्या उच्च शिखरावर गेले, त्यांनीच पुढे जावून इतिहास रचला कशाच्या जोरावर? तर अंतरंगातील सामयीच्या-क्षमताच्या जोरावर, तुम्ही कितीही नकारात्मक भौतिक परिस्थीत असला तरी तुमच्या अंतरंगातील कलात्मकता

हीच तुम्हाला यशाच्या मोठ्या शिखरावर नेउ शकते.

संमोहन उपचाराव्दारे तुम्ही तुमच्या अंतरंगातील कलेशी अंतरंगातील सामथ्याशी एकरूप होउ शकता. संमोहनाव्दारे तुमच्या अंतरगातील कलागुण, कौशल्य, बुध्दीमत्ता, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, एकाग्रता इ. अनेक पटीने विकसीत करू शकतो. तुमची एकाग्रता जेवढी जास्त असेल तेवढी तुमची प्रगती वेगाने होत असते. हवेत सुध्दा आग निर्माण होउ शकते. फक्त एकाग्रता पाहिजे. तुम्ही दिवसभर जरी उन्हामध्ये कागद धरून बसला तरी त्याला आग लागेल का? नाही. परंतु त्या कागदावर मग्नीफाय ग्लास धरला आणि सुर्याची किरण एकत्रित केली तर एका मिनीटात हवेत सुध्दा आग निर्माण होउन कागद जळू लागेल. एवढं महत्व आहे. तुमच्या एकाग्रतेला. तुमचं स्कील, कला, कौशल्य बुध्दीमत्ता यास जर उच्चतम एकाग्रतेची जोड मिळाली तर तुम्ही तुमच्या क्षमतांनी जग हालवून सोडू शकता. संमोहनाव्दारे तुमच्या अंतरंगातील हेच सामर्थ्य अनेकपटीने विकसीत करू शकता. तुम्ही तुमच्या कलेशी एकरूप झाला तर तुम्ही त्या क्षेत्रात इतिहास रचू शकाल. त्या कलेशी तुम्ही जेवढे अधिक एकरूप होचाल, तेवढं तुम्ही त्या क्षेत्रात मोठं यश संपादन करू शकाल. तुमची कला सामान्य आहे. तुमचं मानसीक सामर्थ्य सामान्य आहे. त्यास असामान्य बनवण्यासाठी संमोहन उपचार तुम्हाला मदत करू शकतो. आजपर्यंत अनेक डॉक्टर, वकील, ज्योतिषी, इंजिनीयर, लेखक, डायरेक्टर, डान्सर, एनिमेटड, एडीटर, कवी, उदयोजक इ. असे विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आमच्याकडे येउन संमोहन उपचाराचा लाभ घेतला आहे. डॉक्टर, वकील, ज्योतिषी, इंजिनीयर, लेखक, डायरेक्टर, डान्सर, एनिमेटड एडीटर, कवी, उदयोजक इ. असे विविध क्षेत्रातील

लोकांनी त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आमच्याकडे येउन संमोहन उपचाराचा लाभ घेतला आहे.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×