विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे व उपाय
आज स्पर्धेच्या व आधुनिक युगात इतरांपेक्षा सरस ठरणं, काळाची गरज बनली आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. तर दुसरीकडे विदयाथी / तरुण आधुनिकतेच्या नावाखाली भरकटत चालला आहे. यामध्ये चुकीची मैत्री, चुकीच्या स्वभाव-सवयी, चुकीचं वागणं, मोबाईल अतिरेक, योग्य क्षेत्रात रूचि (इंटरेस्ट) नसणं, निरर्थक गोष्टीची मनाला ओढ लागणं, आळस, कंटाळा नकारात्मकता, इंजॉयमेंटच्या भ्रमात विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाण इ. समस्या विदयाथी / तरूणांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. किशोर वयात आल्यानंतर अनेक मुलांच वर्गात शिकवण्याकडे म्हणावं तेवढं लक्षच नसतं. याच वयात वाढत शारीरीक भिन्नलिंगी आकर्षण, त्याला प्रेमाच नाव देउन मर्यादा ओलांडणं, आगीत तेल ओतणारे टीव्ही, चित्रपटातील अश्लील सीन / गाणी, संगळे फिल्मचा विषय एकच प्रेमकथा, रॅगिंग प्रकार इ. या सर्व वातावरणाचा मुलांच्या मनावर खुप खोलवर परीणाम होत असतो. याच कारणांमुळे विदयार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता कमी होत अभ्यासात वर्गात लक्ष लागत नाही. शिक्षणाकड दुर्लक्ष होउ लागतं. आजकालंच हे बिघडलेलं वातावरण कोणताही पालक नाकारू शकत नाहीत. त्यातच मुलांचं अभ्यासाचं व परीक्षेचं टेन्शन सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.
The Medical Journal Of Basrah University २०१० च्या रिपोर्ट नुसार, अभ्यासाच्या ताणामुळे १२ वी कक्षेतील विद्यार्थ्यांमध्ये ३१ टक्के रक्तदाब, ४१ टक्के डिप्रेशन, २३ टक्के एंझायटी आढळून आली. Medical Dilogues २०१९ च्या रिसर्चनुसार ६६ टक्के मेडीकल विदयार्थ्यांमध्ये उच्च रक्तदाब आढळला. अर्थात आजचा विद्यार्थी उद्या बीपी, मधुमेह, अटॅक, पेरालेसिस, बायपास सर्जरी, हृदयविकार इ. जीवघेण्या आजारांना बळी पडू शकतो. परीक्षेच्या टेंशन व मितीमुळे मेंदूत कॉटीसॉलचा स्तर उच्च होतो. ज्यामुळे विस्मरण प्रक्रिया घडते.
भविष्यात आपल्या पाल्याचं (मुलांच) जीवन यशस्वी व प्रगतशील असावं, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. त्यामुळेच तुम्ही कुटुंबासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी दिवसरात्र झटत असता. तुमच्या दैनंदिन जीवनात नौकरी, धंदा, व्यवसाय, नातीगोती, मान-अपमान, यश अपयश, राजकारण, समाजकारण, शिक्षण, कौटुंबीक जबाबदायी इ. संगळ सांभाळता सांभाळता, तुमची इच्छा असूनही पाल्यासाठी तुम्ही पुर्ण वेळ देउ शकत नाही. त्यांचे स्कूल / कॉलेज, क्लास, मित्र इ. ठिकाणी दिवसातील २४ तास आपण त्यांच्यासोबत राहू शकत नाही. तरीही आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकाला वाटत असते. असे पालक पाल्यांच्या प्रगतीत अडसर ठरणार्या प्रश्नांची उत्तरे नेहमी शोधत असतात. उदा. १) त्याला अभ्यास का करु बाटतं नाही ? २) त्याचं अभ्यासात लक्ष का लागत नाही ? ३) केलेला अभ्यास त्याच्या लक्षात का राहत नाही ? ४) पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा, त्याला एक्झाम हॉलमध्ये का आठवत नाहीत ? इ. एवढी प्रयत्नांची पराकाष्टा करून सुध्दा माझ्या मुलाला अपेक्षीत मार्क का मिळत नाहीत? त्यांना चुकीच्या सवयी का जडतात? त्यांच्यासाठी आपल्याला जे जे चांगल्यातले चांगले आहे अस वाटत. ते ते जास्तीत जास्त देण्याचा पालक आटोकाट प्रयत्न करीत असतो. प्रत्येक स्कूल, कॉलेज विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे हाताळावे? यासाठी याच पुस्तकातील ‘लहान मुलांची सायकॉलॉजी व पालकांच्या समस्या’ हे प्रकरण आवश्य वाचावे.
खुप चांगल्या शाळा / कॉलेजांत घालतो……. तरीही गुण कमीच । उत्तमातल्या उत्तम कोचींग क्लासमध्ये पाठवतो.. तरीही गुण कमीच ! विविध व्यक्तीमत्व शिबीरांना पाठवतो……. तरीही गुण कमीच ! स्मरणशक्ती वाढवणाऱ्या कार्यशाळांना पाठवतो, तरीही गुण कमीच !
माझ्या वैयक्तीक व संसाराच्या अडचणी बाजूलाहठेवून माझ्या पाल्याच्या गरजांना अधिक प्राधान्य दिलं….. तरीही गुण कमीच यासाठीच अनेक पालक, मुलांवर दबाव टाकणं, त्यांना हॅम्बरीग करणं, त्यांच्यावर दडपण टाकणं, बळजबरीने अभ्यास करून घेणं, ज्यादा तास लावणं, त्यांना खेळू- फिरू-बागडू न देणं, कडक बंधणात ठेवणं, त्यांना मारणं इ. यापैकीच उपायांचा अवलंब करीत असतात. एकवेळेस काही पालक मुलाचे शत्रु बनतात परंतु त्याला चुकीच्या मार्गावर जावू देत नाहीत. तरीही बर्याचवेळा उपयोग होत नाही. एवढी तळमळ व प्रामाणीक पालकत्व काही पालकांमध्ये दिसून येतं. अशाच कर्तव्यदक्ष पालकांसाठी हे प्रकरण त्याच तळमळीने आम्ही लिहीत आहोत. तुम्हाला आता तुमच्या पाल्याचा शत्रु बनण्याची गरज नाही. यापुढे तुम्ही त्याला प्रेमाने बाहेर आणू शकाल. त्याच्या क्षमता अनेक पटीने विकसीत करूशकाल. त्यासाठी मुळात त्यांची समस्या काय आहे? हे समजून घेण गरजेच आहे.
वर्ग तोच, शिक्षक तेच, विषय तोच, शिकवण तेच, परीक्षा त्याच, प्रश्नपत्रिका त्याच, वेळ तेवढीच, मग तरीही काही विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवतात. काही ५०-७० टक्के तर काहीजण नापास सुध्दा होतात. असं का? शिकवताना शिक्षक सर्वच विदयाथ्यांना सारखं शिकवतात. तरीसुध्दा एखादयाच्या चांगलं ध्यानात बसतं. तर दुसऱ्याच्या नाही असं का? एवढं सगळं प्रयत्न करूनही अपेक्षीत परीणाम का पाहायला मिळत नाहीत ? त्यासाठी गरज आहे. घेणार्याचा (विदयार्थ्यांचा) घडा सरळ करण्याची. म्हणजे मिळालेलं ज्ञान विदयार्थ्याला व्यवस्थित आत्मसात करता येईल. उदा. शालेय जीवनामध्ये विदयायीमध्ये दोन गट पाडले जातात. एक हुशार मुलांच गट व एक ढ मुलांचा गट. चुकीच्या व अपरिपक्व दृष्टीकोनातून केले गेलेले संशोधन चुकीच्या निष्कर्षर्षाला जन्म देते. बौध्दीक, मानसीक व शारीरीक क्षमतांचं रहस्य या प्रकरणात आपण पाहिलंच की, मुलांचा बुध्दांक हा त्याच्या यशासाठी किंवा त्याला महान बनण्यासाठी महत्वाचा नसतो. आता आपण एक उदाहरण पाहू, हुशार मुलं रोज अभ्यास करतात. टीव्ही पहात नाहीत. पिक्चर पाहत नाहीत, खेळायला जात नाहीत, मित्रासोबत फिरायला जात नाहीत, गावाला जात नाहीत. कोठेही बेळ वाया घालवत नाहीत. वर्षभर फक्त शाळा-अभ्यास, शाळा-अभ्यास करत राहतात. वर्षभर अभ्यास करून ते ८० टक्के मार्क पाडतात, परंतु ज्यांना ढ मुलं म्हटलं जातं, त्यांना रोज अभ्यास करूवाटत नाही. अभ्यास कराय लागलं की, झोप लागते, मोबाईल पाहू वाटतो, मित्राकडं जावू वाटतं. अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून ते रोज अभ्यास करू शकत नाहीत. परंतु परीक्षा एक महिनाभर राहिली की, अशी मुलं अभ्यासाच्या मागे हात धुवून लागतात. पास तरी झालो पाहिजे, थोडी बरी तरी मार्क पहली पाहिजेत. काटावर तरी अशी कशीतरी मनाची समजूत घालून ते अभ्यासाला लागतात. एक महिनाभर अभ्यास करून ४० टक्के मार्क पाडतात. आता मला सांगा, वर्षभर अभ्यास करून ८० टक्के पाडणारा हुशार ? का एक महिना अभ्यास करून ४० टक्के पाडणारा हुशार ?.. तसं पाहिलं तर जास्त मार्क पाडणाराच हुशार. परंतु प्रश्न असा आहे की, जर महिनाभर अभ्यास करून जर विदयाथी ४० टक्के मार्क पाडू शकत असेल तर वर्षभर अभ्यास करून तो ८०-९० टक्के नाही का पाडू शकणार? नकीच पाडू शकतो. फक्त त्याची आपण मुळ समस्या समजून घेतली पाहिजे. तो मंदबुध्दी आहे, तो ढ आहे, तो दगड आहे, ही त्याची समस्या नसून, त्याला रोज अभ्यास करू बाटत नाही. अभ्यासात लक्ष लागत नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. अवघड विषय समजत नाहीत. एक्झाम हॉलमध्ये पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला आठवत नाहीत. ही त्याच्या समस्या आहेत. जर या समस्यांवर मात केली तर ज्याला आपण ढ म्हणतो. तो प्रत्येकजण ८०-९० टक्केच्या पुढे जावू शकतो.
समजा एक ढ मुलगा आहे आणि एक हुशार मुलगा आहे. दोघांना सैराटसारखा एखादा पिक्चर बघायला बसविलं. तर काय होईल? अस होईल का? की, ढ मुलाच्या लक्षात ५० टक्के पिक्चर राहायला. आणि हुशार मुलाच्या लक्षात १०० टक्के पिक्चर राहिला. कदाचित हुशार मुलापेक्षा ढ मुलाच्या लक्षात पिक्चर जास्त राहिल. डायलॉग पाठ, गाणी पाठ, सगळी स्टोरी पाठ. एकदा पिक्चर पाहून पुर्ण लक्षात राहतो. पण वर्गातील पुस्तक दहावेळा वाचलं तरी लक्षात राहतं का? अर्थर्थातच नाही. पिक्चर लक्षात राहतो म्हणजे त्याची एकाग्रता व स्मरणशक्ती चांगली आहे.. प्रश्न असा आहे की, पिक्चर लक्षात राहतो. पुस्तक का नाही? त्याचं कारण असं आहे की, आपल्या मेंदूचे दोन भाग पडतात. एक डावा मेंदू आणि दुसरा उजवा मेंदू जे काम उजवा मेंदू करतो. ते व्यक्तीच्या ९० टक्क्यापर्यंत लक्षात राहतं. जे काम डावा मूंद करतो. ते व्यक्तीच्या १०-२० टक्यापर्यंत लक्षात राहतं. आता हा उजवा मेंदू कधी काम करतो? डावा मेंदू कधी काम करतो? ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, सर्वच आहे. इंटरेस्ट आहे. अशा गोष्टी करताना तुमचा उजवा मेंदू काम करतो. अर्थीत पिक्चर बघताना, मालिका बघताना, मोबाईल बघताना, गेम खेळताना, फिरायला जाताना, गप्पा-गोष्टी करताना, आवडीची कोणतीही गोष्ट करताना, आपला उजवा मेंदू काम करतो. त्यामुळे ते आपल्या ९० टक्यापर्यत लक्षात राहतं. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड नाही, रूचि नाही, इंटरेस्ट नाही. शिक्षकांनी सांगितलय म्हणून करायचय, परीक्षा आलीय म्हणून करायच, कराव लागतय म्हणून करायचय इ. अशा गोष्टी करताना व्यक्तीचा डावा मेंदू काम करतो. अर्थात वाचन करताना, अभ्यास करताना, वर्गात शिक्षक शिकवताना लिहीत असताना विदयाथ्यीचा डावा मेंदू काम करतो. त्यामुळे अभ्यास त्यांच्या १०-२० टक्केच लक्षात राहतो. आणि जास्त लक्षात ठेवण्यासाठी त्यांना अनेकवेळा वाचाव लागत. एक पिक्चर आपण दहावेळा बघतो का? नाही. कारण पिक्चर एकदा पाहिला की, पुर्ण लक्षात राहतो. त्याची सगळी स्टोरी तंतोतंत आपण सांगू शकतो. एखादा आवडीचा असेल तर दोन वेळा पाहतो. परंतु कोणताही पिक्चर दहावेळा पाहत नाही. परंतु एक पुस्तक दहावेळा बाचूनही लक्षात राहत नाही. त्यामुळे ते अकराव्या वेळा पुन्हा वाचावे लागते, लक्षात राहण्यासाठी. एवढच नव्हेतर एखादी प्रेमकथा, गोष्टीचं पुस्तक जरी बाचल तरीही त एकदा वाचून लक्षात राहते. आवडीचा चेहरा, आवडीचं नाव, आवडीच ठिकाण, आवडीचा प्रसंग व्यक्ती कधीही विसरत नाही. एखादा व्यक्ती एखादा मित्राचं नाव विसरेल पण त्याच्या पहिल्या प्रेमाचं नाव तो मरेपर्यंत विसरत नाही. तुमची एकाग्रता व स्मरणशक्तीसाठी आवड, रुचि, इंटरेस्ट याच बाबी महत्त्वाच्या ठरतात. यावरून आपणास काय समजल ? तुमच्या मुलाची एकाग्रता व स्मरणशक्ती पहिल्यापासून
इतर बाबतीत चांगलीच आहे. फक्त अभ्यासात त्याची कमतरता आहे. कारण अभ्यासात रूचि नाही. पालक मित्रहो, तुम्ही आजपर्यंत त्याची स्मरणशक्ती वाढण्यासाठी कलेले अनेक प्रयत्न बाया का गेले? याच उत्तर तुम्हाला मिळाले असेल. अर्थात जोपर्यंत त्याचा इंटरेस्ट अभ्यासामध्ये वाढणार नाही. कनव्हर्ट होणार नाही. तोपर्यंत त्याची अभ्यासामधील एकाग्रता व स्मरणशक्ती वाढणार नाही. पुन्हा एकदा सुचित करतो, तुमच्या मुलाची एकाग्रता व स्मरणशक्ती चांगलीच आहे. तो मंदबुध्दी, ढ किंवा दगड नाही. फक्त त्याची अभ्यासातील एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याच्या अंतर्मनामध्ये अभ्यासाबददल आवड, रूचि इंटरेस्ट निर्माण होणं गरजेच आहे. मग बघा. त्याची अभ्यासातील एकाग्रता व स्मरणशक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक असलली तुम्हाला दिसून येईल. संमोहन उपचाराव्दारे विदयार्थ्याची अभ्यासामध्ये आवड व रुचि निर्माण करता येते. अंतर्मनात ती वाढवता येते. आमच्याकडे आलेले अनेक विदयाची सांगतात. ‘अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी आता पहिल्यासारखा रटटा मारावा लागत नाही. दहावेळा वाचाव लागत नाही. एकदा दोनदा वाचलं तरी सहज लक्षात राहत, वगीत शिकवलेलं आता सहज समजू लागलं आहे.’ अनेक पालक सांगतात, ‘पहिल हिला अभ्यास करण्यासाठी सारख ओरडावं लागायचं. आणि अध्यातासाच्या वर कधीही अभ्यास करत नव्हती. परंतु तुमचा उपचार घेतल्यापासून, न सांगता रोज अभ्यास करत आहे. आणि दोन-दोन तास अभ्यास करत बसते. तरीही तिच्या चेहयावर कंटाळा दिसत नाही.’ बरोबर आहे. आवडीच काम करताना कधी कंटाळा येतो का? अहो, प्रत्येक मुलाला वाटत असंत, “माझी अभ्यासात प्रगती व्हावी, मला संगळयांनी हुशार म्हणाव”. त्यामुळे ते अनेक वेळा ठरवतात सुध्दा उदयापासून अभ्यास चालू करायचा. उदयापासून अभ्यास चालू करायचा. असं ठरवून ते अभ्यासाला बसतात सुध्दा. परंतु अभ्यासात लक्ष लागत नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. मग काय उपयोग? म्हणून मुलं पुन्हा विषय सोडून देतात.
अहो, मला सांगा, स्वतःला हुशार म्हणून घेयला कोणत्या मुलाला / मुलीला आवडणार नाही. वाचलेलं / अभ्यासलेलं लक्षात राहत नाही, म्हणून त्याला अभ्यास करू वाटत नाही. बाचलेलं लक्षात राहिलं तर प्रत्येकजण अभ्यास करेल. प्रत्येक जण अभ्यासात प्रगतीपथावर राहील. काही मुलांना काही विषय अवघड जातात. त्याचही कारण तेच आहे. ते शिकण्यामध्ये रूचीच नाही. हीच मुख्य समस्या आहे. लहानपणी सायकल चालवणं अवघड असतं. परंतु मुलाला ती शिकण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळे तो अनेकवेळा पडतो-झडतो. त्याला अनेकवेळा मुका मार लागतो, रक्त निघत, कधी जखम होते. तरी तो सायकल शिकतोच. का? तर त्याला सायकल शिकण्यामध्ये रूची आहे. सायकल शिकताना जेवढा त्रास झाला, दुखापत झाली. तेवढा त्रास अवघड विषय शिकताना होणार आहे का? नाही. परंतु शिकण्याची तेवढी तीव्र इच्छाच नाही, हा मुख्य प्रोब्लेम आहे. अवघड विषय समजून घेण्याची एकाग्रता व आकलनक्षमता सुध्दा आवडीतूनच जन्माला येते. एक्झाम हॉलमध्ये पाठ करून गेलेल्या प्रनांची उत्तरे त्याला आठवत नाहीत. कारण त्याचा परीक्षेबाबतचा आत्मविश्वास कमी असतो. त्यामुळे त्याचा परीक्षेबाबतचा आत्मविश्वास वाढणं आवश्यक असतं. मुलाची अभ्यासामध्ये रूची निमर्माण केली की, त्याला आपोआपच अभ्यास करूवाटतो, आपोआपच त्याच अभ्यासात लक्ष लागू लागतं. वगीत शिकवतानाही त्याचं लक्ष लागू लागतं. सगळ लक्षात राहू लागतं. रूची वाढल्यामुळे लक्ष लागतं. एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती वाढते. अभ्यास चांगला झाल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास बाढल्यामुळे अवघड विषयही त्याला समजू-उमजू लागतात, सोप वाटू लागतात. संमोहनाव्दारे व्यक्तीची एकाग्रता, स्मरणशक्ती, बुध्दीमत्तेचा विकास तर करता येतोच. सोबतच विदयायींच्या मनात अभ्यासाबददलची वाचनाबाबतची रुची, आवड, इंटरेस्ट निर्माण करता येते. वाढवता येते.
एकाग्रतेचे दोन प्रकार पडतात. १). अटोमॅटीक साधली जाणारी एकाग्रता २). हेतूपुर्वक साधली जाणारी एकाग्रता, आवडीच्या गोष्टींमध्ये अटोमॅटीक एकाग्रता काम करते. तर दुसरी हेतूपूर्वक एकाग्रता. या दोन्ही एकाग्रता वाढवू शकणारे एकही औषध उपलब्ध नाही. परंतु संमोहनाव्दारे दोन्ही एकाग्रता वाढवता येतात. वैदयकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉ विवेक शास्त्री त्यांच्या मानसीक ताण व रामबाण इलाज पुस्तकात लिहीतात, “संमोहनाव्दारे मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, बुध्दीमत्तेचा विकास साधता येतो. त्यांच्या न्यूनगंड नाहीसा होतो, सभाधीटपणा येतो. मिडस्त व लाजरा स्वभाव घालवता येतो. क्रिडा-कौशल्य प्राप्त होते”. संमोहनाव्दारे मुलांचा इंटरेस्ट अभ्यासामध्ये ज्ञानवर्धनामध्ये निर्माण करता येतो. वाढविता येतो. संमोहनाव्दारे विद्यार्थ्यांच्या अंतर्मनातील संकल्पना, धारणा, भावना, दृष्टीकोन, त्याच व्यक्तीमत्व वामध्ये अपेक्षीत प्रमाणात बदल व सुधारणा घडवून आणता येतो. त्यामुळेच संमोहन उपचार घेतल्यानंतर नापास विदयाथीसुध्दा मोठमोठ्या पदावर पोहचतात. खाली मुददाम आम्ही त्यांचे रिझल्ट त्यांच्या परवानगीने तुमच्यासमोर दाखल करीत आहोत.
ऑस्ट्रेलियात अॅलन स्टीव्हर्स या ९१ वर्ष वयाच्या आजोबांनी पूर्व ऑस्ट्रेलियात न्यु इंग्लंड विदयापीठातून पदवी संपादन केली. विशेष म्हणजे सहा वर्षाच्या नियोजीत कालावधीच्या एक वर्ष आधीच पदवी प्राप्त केली.
लखनौ येथील साडेसात वर्षाच्या (३रीच्या मुलीने) सुपमानं दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला. २००७ मध्ये राज्याच्या माध्यमीक शिक्षण विभागानं दिलेल्या परवानगीनंतर सुषमाला थेट नववीत प्रवेश मिळाला. त्यापुर्वीचं शिक्षण तिनं घरीच पुर्ण केलं
सुषमाचाच भाउ शैलेंद्र वयाच्या अकराव्या वर्षी (५ वी च्या मुलाने) १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. दोन्ही भाउ व बहिणीवर जपानमध्ये लघुपट तयार करण्यात आला आहे.
श्रीकृष्ण टाक या जोधपुरच्या वृध्द गृहस्थान वयाच्या ८९ व्या वर्षी पीएचडी पदवी मिळवली.
अर्थात तुमच्या बौध्दीक क्षमतेला कोणत्याही मर्यादा नाहीत. फक्त त्या बौध्दीक क्षमतांचा रहस्य जाणून घ्या, समजून घ्या. चुकीच्या ठिकाणी केललं प्रयत्न बाया तर जाणारच परंतु पदरी घोर निराशा सुध्दा पडणार तुमच्या प्रयत्नांना तेव्हाच यश मिळेल. जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी प्रयत्न कराल.