गोळ्या-औषधाने बरे न होणारे जुनाट मानसिक व शारीरिक आजार
विविध मानसीक व शारीरीक आजार औषध-गोळयांनी बरे का होत नाहीत ?
आजच्या या धावपळीच्या चढाओढीच्या व जीवघेण्या स्पर्धात्मक युगात भौतिक सुखसोयींची एवढी रेलचेल असूनही, माणूस आपलं मानसीक स्वास्थ्य हारवून बसला आहे. त्याच्या दैनंदिन जीवनात नोकरी, धंदा, व्यवसाय, नाती-गोती, मान-अपमान, यश-अपयश, शिक्षण, समाजकारण, राजकारण, समाजकारण, कौटुंबीक जबाबदाऱ्या…. हे संगळ संभाळता- संभाळता मानवी मनावर ताण निमर्माण होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी धरपडत आहे. विद्यार्थी अभ्यासात पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे, नोकरदार नोकरीत, तर व्यवसायीक व्यवसायात टिकून राहण्यासाठी व अधिक प्रगतिशील होण्यासाठी प्रयत्नशील आहे. गृहिणी संसाराचा गाडा ओढता- ओढता पतीची मानसिकता सांभाळण, तसेच मुलांचं शिक्षण, त्यांच्यावरचे संस्कार अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत..
वरीलपैकी प्रत्येक जण प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहेत. हे ताणतणाव झोप तर उडवितातच, परंतु विविध मानसीक-शारीरीक व्याधींनाही कारणीभूत ठरत आहेत. इ १० वी १२ वीचे विदयाथी रक्तदाब व मधुमेहाचे शिकार होत आहेत. बरेच मोठमोठे जबाबदार सरकारी अधिकारी, नोकरदार स्ट्रेस डायबेटीसच्या गोळया खिशात घेउनच डयुटीवर जात आहेत. तर काही नोकरदार व व्यवसायीकांना वयाच्या चाळिशीतच हार्ट सर्जरीची गरज पडत आहे. गृहिणीपण वयाच्या पस्तीशीपासूनच विविध दुखण्यांच्या जाळयात अडकत आहे
वरील प्रकारच्या समस्यांमुळे कार्यक्षमता कमी होत जाते. संबंधित व्यक्ती आपल्या क्षेत्रात आणखीनंच मागं पडत जातो. त्यामुळे ताण आणखी वाढत जातात व कार्यक्षमता आणखी कमी होत आहे. संबधीत व्यक्ती आपल्या क्षेत्रात आणखी मागे पडत आहे, अपयशी ठरत आहे. व हे दुष्टचक्र असचं सुरू राहतं.
आपल्या मानसिक ताणांमुळे मिती, काळजी, चिंता, टेंशन दडपण, धडधड, निराशा, उदासीनता, निद्रानाश, तोतरेपणा इ. मानसीक समस्या उद्भवतात. एकूणच एकाग्रता आत्मविश्वास कमी होणे, राग, चिडचिडपणा, मानसीक आघात दुःख, घरातील मिन्न स्वभाव-वादविवाद, शीघ्रकोपीपणा, बेचैनी, अस्वस्थता, एकलकोंडेपणा, व्यसनांच्या आहारी जाणं, न्यूनगंड, वैफल्य, नकारात्मक विचार, आत्महत्येचे विचार इ. मानसीक समस्यांना लोक बळी पडत आहेत. अनेक रुग्णांना जीवनात रसच वाटत नाही. कशातच आनंद मिळत नाही. उत्साही, प्रसन्न वाटत नाही. काहीच शिल्लक राहिलं नाही, असं वाटतं.
उदास वाटतं. असे लोक फक्त जगायचं म्हणून जगत असतात. असे लोक फक्त इतरांसाठी जगत असतात. या सर्व समस्यांच कारण म्हणजे मनात काही कारणास्तव घडून आलेले भावनात्मक असंतुलन ! ते दूर केल्याशिवाय व्यक्ती जीवनाचा आस्वाद घेऊ शकत नाही. ताण हे मानसीक आरोग्य तर बिघडवतात. त्याच मानसीक ताणांचा शारीरीक आरोग्यावरही खूप मोठा विपरीत परिणाम होत असतो. मानसीक ताणांमुळे शरीरात कॉर्टिसाल, अॅड्रेनॅलीन, स्टीराईड, कोलेस्ट्रोल इ. रासायनिक द्रव्य प्रमाण वाढत जाते. याच रासायनिक द्रव्यांमुळे शरीर कार्यर्यात, पेशी, संस्था-स्नायू, अवयव इ. मध्ये अडथळा निर्माण होउ लागतो. त्यामुळे पुन्हा शरिरकार्यात ताण निर्माण होतो. याच कारणांमुळे व्यक्तीस बी.पी. मधुमेह, अटॅक, बायपास सर्जरी, ब्लॅकेस, पेरालेसिस, हृदयविकार, ट्युमर इ. जीवघेण्या प्रसंगाला व्यक्तीला सामोर जावं लागतं. याच तणावामुळे शरीरातील हाडे, सांधे, स्नायू, मणका, कंबर, मान, ग्रंथी, संस्था, अवयव इ. सर्वच शारीरिक घटकांमध्ये कमजोर होऊन जातात. तसेच ताणांमुळे वाढणायी रासायनिक द्रव्यामुळे मुळात शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमजोर होत जाउन, डोकेदुखी, अर्धशिशी, चकर येणं, फिट येणं, अपचन, आम्लपित्त, पोटाच्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी, गर्भपात, दमा, थॉयराईड, केस गळणं, पुटकुळ्या, सांधेदुखी, स्नायुदुखी, हातापायाला मुग्या येणं, तळपायाची आग आग होणं, लैंगिक कमजोरी, त्वचारोग, अॅलजी असे विविध शारीरीक आजार उदभवू लागतात.
* सगळ्यातमोठी समस्याः
आज मानवाची सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की, काहीच टेंशन नाही घेतलं तर माणसाची प्रगतीच होणार नाही. कसलच टेंशन नाही घेतलं तर विदयाथी अभ्यास करणार नाही, कौटुंबीक व्यक्ती काम करणार नाही. प्रगती होणार नाही. कशाचीच मिती बाळगली नाही तर पोलीसांना कोणी घाबरणार नाही. देवाला (कर्मफळाला) कोणी घाबरणार नाही. समाजामध्ये अराजकता माजेल. अनैतिकता माजेल. आपण कोणाचीच काळजी नाही केली तर इतरांना वाटेल याचं कोणावरच प्रेम नाही. चिंतन नाही केलं तर भविष्यकालीन नियोजन कसं होणार? चिंतन हे चिंता नाही झालं पाहिजे, हे ही महत्वाचं आहे. अर्थीत माणसाच जीवन हे मानवाच्या शरीरासारखच आहे. शरीरात साखर पाहिजे, कॉलेस्ट्रॉल पाहिजे, कॉटीसॉल पाहिजे, शुगर (साखर) पाहिजे पण संगळ योग्य प्रमाणात पाहिजे. माणसाच्या जीवनात प्रतिकूल भावना सुध्दा पाहिजेत परंतु योग्य प्रमाणात. परंतु समस्या अशी आहे की, संसारी जीवनातील विविध जबाबदाऱ्या संभाळता संभाळता या प्रतिकूल भावनांवर ताबा व नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही. त्याचे प्रमाण कधी कमीअधिक होईल, हे व्यक्तीलाही समजत नाही.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याच्या कारणांमध्ये मानसीक ताण हे मुख्य कारण आहेच. परंतु क्षणार्धात रोगप्रतिकारशक्ती कमजोर करणारे दुसरे कारण म्हणजे भय व नकारात्मक भावना.
हे आपण ‘रोगप्रतिकार यंत्रणा, हेच तुमच्या आरोग्याचं रहस्य’ प्रकरणात सविस्तर पाहिलेच आहे. कोरोनाच्या काळात आपल्यापैकी अनेकांची रोगप्रतिकार शक्ती भय व नकारात्मक भावनेमुळे कमजोर झाली होती. त्यामुळेच सुरुवातीला अनेक जण मेले. परंतु नंतर कोरोनाने कोणीही मरेना. आत्मविश्वासाने जर तुम्ही एखादया आजाराला सामोरं गेलात तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती बाढते. तुम्ही संबंधित आजारावर लवकर मात करू शकता. परंतु जर तुम्ही घाबरला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते, आजार वाढत जातो, ब-याचदा यातच व्यक्तीचा मृत्यु होतो. एकूणच मानसीक ताणामुळे माणसाच्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळे निर्माण होणारे विविध मानसीक व शारीरीक आजार बरे करण्यासाठी व्यक्ती, जस की. कौन्सलिंग (समुपदेशन), अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, नेचरोपॅथी इ. असे विविध औषधोपचार करीत फिरतो. हा डॉक्टर तो डॉक्टर, ही पॅथी- ती पॅथी फिरत राहतो. वर्षानुवर्ष पॅथी व डॉक्टर बदलत राहतो. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली तरीही अपेक्षीत रिझल्ट का मिळत नाहीत? तर तुमच्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण, हेच या सर्व आजारांचं मुख्य कारण आहे. अनेक वर्ष कोठेही अपेक्षीत रिझल्ट न मिळाल्यामुळे शेवटी व्यक्ती अंधश्रध्देकडे वळतो. आज २१ व्या युगातही विविध मानसीक व शारीरीक आजारांवर मात करण्यासाठी, घरातील सुखःशांतीसाठी स्वतःच्या प्रगतीसाठी कुटुंबातील व्यक्तीच्या स्वभावात-वर्तणुकीत बदल होण्यासाठी, अनेकजण गंडेदोरे, सिध्द ताबीज लॉकेट, घरामध्ये होम-हवन, श्राध्द करणं, त्र्यंबकला जावून नारायण नागबली करणं, कालसर्प योग करणं, पारायणं, अभिषेक, रेकी, वास्तुशास्त्र, बाबा-बापु-बुवा, तिख्यतीला जावून मुंडण करणं, राशीचे खडे, नवस, उपास-तापास, पितृदोष काढणं, मांत्रीक तांत्रीक, बास्तुशांती, कुंडली, जागरण, पत्रिका भविष्य, दर्गी- मंदिर – मशीद इ. अनेक गाष्टी करत राहतात. परंतु या उपायांनी अंतर्मनात अपेक्षीत बदल न झाल्यामुळे अपेक्षीत रिझल्ट मिळत नाहीत. एक महत्वाची बाब जाणून घ्या, घरातील सुखःशांती ही त्या घरातील व्यक्तींच्या स्वभावावर अवलंबून असते, स्वतःची प्रगती स्वतःच्या मानसीक बौध्दीक क्षमतेवर सामयीवर व आत्मविश्वासावर अवलंबून असते. आत्मविश्वास कमी झाला की जीवनातील अडचणी व अपयश आपोआप वाढत जाते. चुकीच्या स्वभाव-सवयी-वर्तन हे त्या व्यक्तीच्या अंतर्मनात वसलेलं असतं. त्यामुळे इतर बाहय उपायांनी त्या व्यक्तीला अपेक्षीत परीणाम पाहायला मिळत नाही. मग या अंधश्रध्दाळू बाबींमध्ये आणखी वाढ होत जाते. वरील उपाय करणं, ही समस्या नसून वरील उपाय करूनही लोकांना वर्षानुवर्षे अपेक्षीत रिझल्ट मिळत नाहीत. ही मुख्य समस्या आहे. वर्षानुवर्षे व्यक्ती हिकडे-तिकडे, हा बाबा-तो बुवा करीत राहतो. त्याचा वेळ, पैसा आणि वय सुध्दा वाया जात राहत. तरीही त्याच्या वेदना यातना त्रास काही केल्या कमी होत नाही. व्यक्तीला जीवनातील निघून चाललेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. त्यामुळे या समस्यांच मुख्य कारण समजून घेणं गरजेचं आहे. आजपर्यंत मनाला स्वभावाला सवयीला औषध नाही, अशी समजूत होती. म्हणून आपल्या समाजात त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी वरील प्रकारच्या अंधश्रध्दाळू गोष्टी केल्या जात होत्या. परंतु आता अंदाजे अंधश्रध्दाळू प्रयत्न करण्याची गरज नाही. व्यक्तीच्या मनाला स्वभावाला-सवयीला आता ओषध आल आहे. ते म्हणजे संमोहन ! जागतीक आरोग्य संघटना, भारत सरकारची संमोहन प्रचाराबाबत सर्व राज्यांना विशेष शिफारस केली आहे. संमोहनाच महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. संमोहन हे आधुनिक सुशिक्षीत, वैज्ञानीक समाजासाठी कल्याणकारी ठरत आहे. फायदेमंत व अनिवार्य बनत चाललं आहे.
* मानसीक समस्या गोळया औषधाने बयी का होत नाहीत ?
पाच-पाच, दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्ष मानसीक समस्यांसाठी गोळया खाणारे माझ्याकडे येतात व विचारतात की, सर इतक्या वर्ष झालं, गोळया खात आहे. तरीही रिझल्ट का मिळत नाही? मी सांगतो, तुमचा प्रोब्लेम मानसीक आहे का शारीरीक? ते म्हणतात. मानसीक. गोळया कशावर परिणाम करतात? शरीरावर (शरीराच्या नर्व्हस सिस्टीमवर)। भित्रा माणूस गोळी खाउन धाडशी होउ शकेल का? नकारात्मक व्यक्ती गोळी खाउन सकारात्मक होतील का? एखादयाच्या मनात तिरस्कार आहे, गोळी खाउन करुणामयी होईल का? नाही. अजिबात नाही. या जगात तुमची भावना / धारणा व विचार बदलणारी एकही गोळी उपलब्ध नाही. मानसीक समस्यांमुळे व्यक्ती हायपर होत असतो. त्याच्या भावना आक्रमक होऊ लागतात. त्या आक्रमक होऊ नये यासाठी रुग्णाची नर्व्हस सिस्टीम रिलॅक्स ठेवण्याचं, मंद करण्याचं, त्याला गुंगीच्या अवस्थेत ठेवण्याचं काम गोळी करीत असते. अर्थात गोळी तात्पुरती लक्षणे दूर करते. परंतु मनातील समस्या तशीच असते. समस्या मनामध्ये आहे आणि उपचार शरीरावर चालू आहे. असं दहा वर्षच काय? मरेपर्यंत जरी उपचार केला तरी मनातील समस्या नष्ट होईल का? मनातील समस्या नष्ट करण्यासाठी मनावर उपचार होणं गरजेच आहे. जोपर्यंत मनावर उपचार होणार नाही, तोपर्यंत मनातील समस्या नष्ट होणार नाहीत. किटीकल परीस्थितीत, माईंड विड्रोलिंग कन्डीक्शनमध्ये रूग्णांना काहीकाळ गोळया-औषधांचा आधार घ्यावाच लागतो. इमर्जन्सी मध्ये औषध घेणं, आवश्यकच आहे. परंतु दीर्घकाळ गोळ्या औषधे घेणं, आरोग्यासाठी घातकच आहे. मनावर उपचार करणारी एकमेव सर्वमान्य व सुरक्षीत उपचार पध्दत म्हणून आज संमोहनाकडे पाहिलं जात आहे. आमच्याकडे आतापर्यंत दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षींच्या गोळया सुटलेल्याचे अनुभव आहेत. मनावर योग्य पध्दतीने अभ्यासू व अनुभवी संमोहन तज्ञांनी उपचार केल्यास तुम्ही बऱ्यापैकी गोळीतून मुक्त होउ शकता. संमोहन त्यासाठी तुम्हाला मदत करू शकतं. पुढे याच पुस्तकामध्ये अनेकांचे रिझल्ट, रिपोर्ट व अनुभव पाहणार आहोत.
* विविध शारीरीक आजार गोळया औषधाने बरे का होत नाहीत ?
आताच आपण शारीरीक आजारांची मुळ कारणं पाहिली. अर्थात शरीराला कमजोर करणारी कारणे सुध्दा मानसीकच आहेत. त्यामध्ये ताण, नकारात्मकता, भय, त्रासदायक आठवणी, मानसीक आघात दुःख इ. कारणं आढळून आली. त्यामुळे जर मनावर योग्य पध्दतीने उपचार झाला तर शरीरातील कितीही जुनाट, असाध्य व दुर्धर आजारांवर तुमच्या शरीराला मात करण्यासाठी, संमोहन मदत करू शकतं. त्यासंदर्भातील अनेक रिझल्ट, अनुभव, रिपोर्ट पाहणारच आहोत. असं म्हटलं जातं की, ‘तुमच्या मनावरील व शरीरावरील तणाव नष्ट केला, तर शरीर तेच करेल, जो त्याचा स्वभावगुण आहे, स्वतः स्वतः ला दुरुस्त करणे’. तुमच्या शरीरामध्ये करोडो कोशिका-संस्था आहेत. ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं तर कितीही मोठ्या आजारा वर त्या सहज मात करतात. परंतु त्या कमजोर झाल्या तर मात्र त्या किरकोळ आजारावरही मात करु शकत नाहीत. अशावेळी त्याचा आजार वाढत जातो. हाताबाहेर जातो. कधी कधी यातच अंत सुद्धा होतो. अशा सर्व शारीरिक आजारांना वैद्यकीय भाषेत, सायकोसोमॅटीक आजार म्हणतात. सायको म्हणजे माईड (मन) आणि सोमो म्हणजे शरीर. या शब्दाचा अर्थ एवढाच की, तुमच्या शरीरात जे आजार आहेत, त्याच मुख्य कारण तुमच्या मनात आहे.
वैदयकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉ विवेक शास्त्री आपल्या ‘मानसीक ताण इलाज रामबाण’ या पुस्तकात विविध मानसीक व शारीरीक आजारांबददल लिहीतात. मानसीक ताणामुळेमनोशारीरीक (सायकोसोमॅटीक) आजार निर्माण होतात.
क) मनोशारीरीक विकार (psychosomatic ailments): संमोहन उपचार पध्दतीमुळे हृदयविकार, दमा, डोकेदुखी, अर्धशिशी, रक्तदाबवृध्दी, मधुमेह, जठखण, स्त्रीयांच्या अंतःस्रावाच्या समस्या, असात्म्य, लठ्ठपणा, शांतता दुखणे, पक्षाघात, आम्लपित्त, मलबद्धता, फेफरे येणं, गर्भपात होणं इ. मनोशारीरीक आजार संमोहनाने बरे होउ शकतात, वेदनारहित प्रसूती संमोहनाव्दारे शक्य होते. लठ्ठपणा नाहीसा होऊ शकतो. A TEXTBOOK OF PSYCHIATRY SIXTEN EDITION NIRAJ AHUJA MD,MRCPsych Previously, Associate Profssor (Psychiatry) GB Pant Hospital and Associated Maulana Azad Medical College (MAMC) and lok NayakHospital, New Delhi
या पुस्तकात समाविष्ट केलेल्या शारीरिक आजारांची यादी.. – मनोशारीरीक आजार यादी (Psychosomatic disorders Table)
* हृदय व रक्तवाहीन्यासंबंधी आजारः अतिउच रक्तदाब, हृदय रक्तवाहीन्यांचा विकार, हृदयाच्या सर्जरीनंतरचा उन्माद, तीव्र डोकेदुखी मेंदुच्या रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, रक्तवाहीन्याचे आजार. अंतस्रावचे आजारः मधुमेहामुळे रक्तात व लघवीत आढळणारी साखर, हायपर थायरॉईड, कंशिग विकृती, बध्दकोष्टता, मासीक पाळीच्या तक्रारी, प्रदर. पोटाच्या आताड्यासंबंधी आजारः अन्ननलिकेचे आजार, पचनक्रियेचे आजार, आताड्याची सुज व त्याचा अल्सर. रोगप्रतिकारासंबंधी समस्याः त्वचारोग, वासनलिकेचे आजार, जंतु ससंग अर्थीत सततची सदी खोकला * हाडे व स्नायू संबंधी आजारः सांधेदुखी, स्नायूदुखी. श्वासासंबंधश आजारः श्वासनलिका आस्थमा उच्च ताप, अशुध्द रक्तवाहीन्या. त्वचेचे आजारः सोरायसिस, कंड, अंगावर गांधी उठणे, टकल पडणे, पिंपल्स, जांभळ्या रंगाचे बिंदु व चट्टे ट्रिकोटिमोर्मेनिया, दाह, उष्णता, त्वचेवरील लाल पुरळ, चामखीळ इ
आपल्या शारीरीक आजारांचा वरील तक्ता पाहता दोन गोष्टी लक्षात येतात. १. शरीरातील जवळजवळ ८०-९० टक्के शारीरीक आजार हे वैज्ञानीक दृष्टीकोनातून सुध्दा मनोशारीरीक अर्थीत मानसीक कारणांमुळे (मानसीक ताण, नकारात्मक धारणा विचार, भय, अज्ञान, मानसीक आघात इ.) निर्माण होत असतात. ताणांमुळे शरीरातील अवयव, संस्था, स्नायू, नसा, रक्तवाहिन्या इ. सर्वच आंतरिक शारीरिक घटक कमजोर होतात त्यामुळेच शरीरातील त्या त्या भागात विविध प्रोब्लेम व कमजोरी निर्माण होत जाते. आपणास असे शारीरीक आजार झाल्यास आपण त्या आजारांच्या मुळ कारणांबर उपचार न करता. आपण त्या आजारांच्या लक्षणांवर औषधोपचार करीत फिरतो. त्यामुळे वर्षानुवर्षे अपेक्षित रिझल्ट मिळतच नाहीत. कारण या विविध शारीरीक आजारांची मुळ ची मुळ वैज्ञानीक कारण म्हणजे शरीराची नेसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमजोर होणं, हे आहे. ही रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याची कारणं सुध्दा मानसीक आहेत. आपण जोपर्यंत त्यावर उपचार केला जाणार नाही. तोपर्यंत त्या आजारांवर मात करणं, माणसाला जमूच शकत नाही. मानसिक, शारीरिक, लैंगिक आजार कोणताही असो, त्यासाठी दीर्घकाळ गोळ्या औषधे खाणं हे आरोग्यासाठी घातकच आहे. क्रिटिकल कन्डीशनमध्ये त्यासाठी औषधोपचारासोबत अर्थीत आजारांच्या लक्षणांवर उपचार करत असताना, त्या विविध शारीरीक आजारांच्या मुळ मानसीक कारणांवर सुध्दा उपचार केल्यास, वर्षर्षानुवर्षे गोळया औषधांना दाद न देणारे शारीरीक आजार जादूसारखे बरे होउ लागतात, असा हजारो रुग्णांचा अनुभव आहे. औषधोपचार व संमोहन जर हातात हात घालून काम करू लागले तर जनकल्याण साध्य करता येईल, या तिळमात्र शंका नाही.
शरीर, नर्व्हस सिस्टीम व मनः
मनुष्याच्या आरोग्याचं रहस्य समजण्यासाठी जास्त खोलवर न जाता, साधारण भाषेत शरीरातील नर्व्हस सिस्टीम ला समजून घेणं गरजेच आहे. आपल्या नर्व्हस सिस्टीमचे दोन भाग पडतात. १. सोमँटीक नर्व्हस सिस्टीम व २. अटोमॅटीक नर्व्हस सिस्टीम. आपल्या पंचेंद्रियांच्या साहायाने देवाण- घेवाण, शारीरीक हालचाली, बौध्दीक क्रियाकलाप अर्थात उठणं बसणं, चालणं-बोलणं, ऐकण-विचार / तर्क करणं, काम करण, इ. बाबी या सोमॅटीक नर्व्हस सिस्टीममध्ये मोडतात. या सोमॅटीक नर्व्हस सिस्टीमवर आपल्या बाहयमनाचा (बुध्दीचा) ताबा असतो. परंतु आपण झोपलेलं असो अथवा जागं असो. आपली पचनक्रिया, हृदयाचे ठोक, मेंदूची कामे, शरीरातील विविध संस्थांची कामे इ. अंतर्गत कार्य ही अटोमॅटीक नर्व्हस सिस्टीमव्दारे चालू असतात. उदा. दोन व्यक्तीने रात्री सोबत चपाती व भाजी खाल्ली. पण त्यातील एकाला अपचनाचा त्रास आहे तर दुसर्याची पचनक्रिया चांगली आहे. ज्याची पचनक्रिया चांगली आहे, त्याला सर्व सहज पचेल, एकदम निवांत झोपेल व उठेल. परंतु ज्याला अपचनाचा त्रास आहे. त्याला झोपेतही त्रास होईल. अन्न व्यवस्थीत पचन होणार नाही. पोट साफ होणार नाही. अर्थात व्यक्ती झोपला तरी व्यक्तीच्या संस्था जस प्रोग्रॅमिंग (अटो नर्व्हस सिस्टीम) आहे. तशाच काम करतात किंवा जशा स्मृती रुजल्यात तशाच काम करतात. संमोहन अवस्थेत शरीरातील अंतर्गत संस्थाचे प्रोग्रॅमिंग (धारणा) बदलल्यास त्याच्या कार्यर्यात पहिल्याच दिवसापासून सुधारणा घडून आलेली दिसून आली आहे. कारण शरीरातील विविध अवयव, संस्था, स्नायू वर मेंदूचं नियंत्रण असतं. आणि मेंदूवर अंतर्मनाच नियंत्रण असतं. आणि संमोहनाव्दारे अंतर्मनावर नियंत्रण प्रस्थापित करता येतं. अर्थात माझ्या अनुभवानुसार सोमॅटीक नर्व्हस सिस्टीम वर जसं बाहयमनाचं नियंत्रण असतं. तसेच शरीरातील आंतरीक अॅटोमॅटीक नर्व्हस सिस्टीमवर अंतर्मनाचं नियंत्रण असल्याचं आढळून आलं आहे. संमोहन अवस्थेत अनेक प्रयोगाव्दारे हे सिध्द झालं आहे.
१. संमोहनावस्थेत हात बधीर करून इंजेक्शन हातातून आरपार करणे, हा प्रयोग मी नेहमीच करून दाखवत असतो. स्टेज प्रयोगात किंवा एखादा व्यक्ती उपचारासाठी आला तरी दाखवता येते. संमोहनावस्थेत अवयव, संस्था, स्नायू वर अंतर्मनाच मेंदूव्दारे कसं नियंत्रण असतं? हे या प्रयोगातून सिद्ध होतं. संमोहनावस्थेत कोणतंही गोळी किंवा इंजेक्शन न देता, फक्त सुचनांव्दारे संमोहीत व्यक्तीचा हात बधीर होतो. संमोहनात हात बधीर केल्यानंतर सुई आरपार केली तरी त्याला काहीही वेदना होत नाही, एवढचं नव्हे तर इंजेक्शन बाहेर काढलं आणि त्याच्या हातातून रक्त येउ लागलं. आणि संमोहन तज्ञानी सुचना दिली की, मी आता १.२,३ अंक मोजताच रक्त वाहण बंद होउन जाईल. तर अंक मोजताच रक्त वाहणं, तात्काळ बंद होउन जाते. एवढं नियंत्रण संमोहनावस्थेत शरीरातील अंतर्गत संस्थावर मिळवता येते.
२. स्टेज शोच्या दरम्यान संमोहनावस्थेत व्यक्तीचं शरीर ताठ करून, त्याच्या पायाकडे एक खुर्ची व मानेकडे एक खुर्ची असा त्या व्यक्तीच शरीर दोन खुच्र्यांवर अंधातरी उचलून ठेवलं जातं. तरीही तो एखाद्या टेबलावर झोपल्या सारखा अंधातरी दोन खुच्र्त्यांवर सरळ झोपलेला असतो. दोन खुच्र्यां मध्ये कसलाही आधार नसतो. एवढच नाही तर त्याच अवस्थेत त्याच्या पोटावर ७०-८० किलोचा व्यक्ती उभा केला जातो. तरीही त्या अवस्थेत तो व्यक्ती तो वजन पेलून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. या प्रयोगानंतर स्टेज शो पाहणाऱ्या सर्व लोकांना समजते की, आपल्या शरीरात अतिरीक्त क्षमता व बळ प्रचंड आहे. संमोहनाव्दारे ते वाढवता येउ शकतं. खेळाडूंसाठी तसेच लैंगिक कमजोरी, शारीरीक कमजोरी, अशक्तपणा दूर करण्यासाठी संमोहनाचा चांगला उपयोग होतो. आणि तो ही अगदी नैसर्गिकपणे, एकदा माझ्याकडे ८२ वय असलेले आजोबा आले. त्यांना नीट चालता येत नव्हते. चालताना त्यांचा तोल जायचा. ते मेलकडायचे, माझा संमोहन उपचार घेउन घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाहेर अंघोळीसाठी चुलीवर तापवलेल गरम पाणी, त्यांनी स्वतः उतरवलं, त्यामध्ये इसान (गार पाणी मिक्स) केलं. आणि पाण्याची भरलेली बादली बाहेरच बाथरूम मध्ये नेली आणि अंघोळ करूलागले. त्यांची मुलं व सुना आश्चर्यचकीत झाले. आठ दिवसानंतर ताठ चालत चालत आले. येताना माझ्यासाठी प्रेमापोटी त्यांच्या रानातील मकेची कणसं घेउन आले. प्रमाने दिलेल्या भेटीत एक वेगळाच गोडवा असतो. ५५ वयाच्या आजोबाने तर त्यांची लैंगिक समस्या दूर झाल्यानंतर मला भेटायला आल्यानंतर पेढे व थमसअप घेउन आले होते, असे अनेक किस्से आहेत. असो. संमोहनावस्थेत एखाद्या अवयवाला ताकद ही देता येते किंवा त्याला कमजोर ही बनवता येते. पचनक्रियेत सुधारणा ही घडवून आणता येते आणि प्रयोगासाठी म्हटलं तर पचनक्रिया एका दिवसात कमजोर सुध्दा करता येते. एका दिवसात अपचन सुध्दा घडायला सुरुवात होते. अर्थात संमोहन अवस्थेत मन, भावना, धारणा, बिलीफ सिस्टीम, दृष्टीकोन, स्वभाव- सवयी-वागणं यामध्ये तर बदल करता येतोच. परंतु सोबतच मनुष्याच्या शरीरातील अवयव, सांधे, स्नायू, संस्था यांच्या कार्यीमध्ये सुध्दा अंतर्मन मेंदूच्या साहायाने बदल व सुधारणा घडवून आणते. त्यामुळे संमोहन उपचाराने असे विविध मानसीक व शारीरीक आजार जादूसारखे बरे होउ लागतात.
3. ३. एका व्यक्तीला प्रयोगासाठी संमोहनाच्या गाढ अवस्थेत सुचना दिली, ‘यापुढे तुला लघवी लागेल परंतु लघवी होणार नाही’. तर त्या व्यक्तीची दोन दिवस लघवीच झाली नाही. लघवीमुळे त्याच्या पोटात दुखु लागले. लघवी भरपूर साठली होती, परंतु लघवीच होत नव्हती. त्यानंतर संमोहनावस्थेत नेऊन, सुचना बदलली. आणि नंतर त्याची लघवी नेहमीप्रमाणे सुरळीत होऊ लागली.
४. एका व्यक्तीला प्रयोगासाठी संमोहनाच्या गाढ नेऊन सुचना दिली, ‘दोन दिवसांत तुझ्या डाव्या दंडावर सुपारी एवढी गाठ येईल’. तर दोन दिवसांत त्याच्या दंडावर सुपारी एवढी गाठ निमर्माण झाली. नंतर ती संमोहन सुचनाद्वारे नष्टही केली. असे अनेक प्रयोग केले आहेत. याचे प्रमाण मी प्रत्यक्ष प्रयोगसह कधीही देऊ शकतो. अर्थात संमोहनाच्या मदतीने व्यक्तीच्या मनावरील शरीरावरील ताण नाहीसा करता येतो. भविष्यात ताण येऊ नये याची व्यवस्था करता येते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, शरीरातील त्या त्या अवयव, संस्था, स्नायू, नसा इ. संमोहनाद्वारे बळ देता येतं. त्यांची कार्यक्षमता सुधारता येते. त्यांना निरोगी बनवता येते.
शरीरातील आंतरीक संस्थांचं कार्य बाहय कोणताही उपचार बदलू शकत नाही. फक्त त्याच व्यक्तीच अंतर्मन त्याच्या आंतरीक संस्थांच कार्य बदलू शकत. त्यामुळे ज्यावर विश्वास बसणार नाही, असे रिझल्ट आपणास संमोहन उपचाराव्दारे पाहण्यास मिळतात. याठिकाणी मुददाम नमूद करीत आहे की, व्यक्तीला बरे करण्याची क्षमता, त्याचे सामर्थ्य व बळ वाढवण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असते. संमोहन फक्त त्या व्यक्तीच्या आंतरंगातील क्षमतेला (शक्तीला) चालना देण्याचं कार्य करते.
– डॉ आनंद नाडकर्णी आपल्या ‘आरोग्याचा अर्थ’ या पुस्तकात लिहीतात..
आपल्या प्रत्येकाच्या मानसीक अवस्थेचा आणि शारीरीक आरोग्याचा अगदी घनिष्ट संबंध आहे. ही गोष्ट सूर्य प्रकाशा इतकी सत्य आहे. पण रोगजंतूशी लढण्याच्या ज्या प्रतिकार पध्दती शरीर आमलात आणते (इम्युनिटी). त्यावरही मानसीक स्थितीचा प्रभाव पडतो. या इम्युनिटीचे दोन उपप्रकार पडतात. सेल्युलर इम्युनिटी व हयुमोरल इम्युनिटी, क्षयरोगासाठी तपासण्या करताना कातडीवर जी मांटू’ टेस्ट करतात, त्यामध्ये सेल्युलर इम्युनिटीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतो. या इम्युनिटीच्या कार्यक्षमतेवर या टेस्टची कातडीवर दिसणारी रिअॅक्शन अवलंबून असते. ‘संमोहन शास्त्राचा वापर करून ही संपुर्ण रिअॅक्शन हवी तशी वळवता येते, हे सिध्द झालं आहे. म्हणजेच कोणत्याही रोगाचा सामना करताना मन व शरीर एकात्मतेनं कार्य करूशकतं. त्यातून शरीरामध्ये योग्य ते अपेक्षीत बदल घडवून आणू शकतं.
आज वैदयकीय क्षेत्रातसुध्दा मनाचा शरीराशी संबंध जोडणायी, त्यावर संशोधन करणायर्या विविध शाखा उदयास आल्या आहेत.
Psyco-neuroimmuno-endocrinology या अगडबंब नावाचं विज्ञान आज उदयास आले आहे. थोडक्यात याचा अर्थ एवढाच की, मनाचा, मज्जासंस्थेशी, प्रतिकारशक्तीशी आणि अंतःप्रेरक हामीन्स / हामीन्सचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे.
एडस व कॅन्सर साठी ‘सायको न्युरो-इम्युनॉलॉजी’,
हृदयरोगांसाठी ‘सायको- न्युरो काडीओलॉजी’ रक्ताच्या आजारासाठी ‘सायको न्युरो-हेमॅटोलॉजी’
इ. मनावर व मनाव्दारे या रोगांवर संशोधन करणाऱ्या विविध शाखा उदयास आल्या आहेत.
वाचकहो, शरीरातल्या सगळ्या संस्था, स्नायू, अवयव यांच्यावर मेंदूचं नियंत्रण असतं. मेंदूवर अंतर्मनाच नियंत्रण असतं. समोहनाव्दारे आपण अंतर्मनात सूचना पाठवू शकतो. अंतर्मनात योग्य त्या सुचना गेल्यास त्या त्या संस्था, स्नायू, अवयव यांच्यामध्ये सुधारणा घडून येउ लागतात. अंतर्मन हे दुधारी शस्त्र आहे. अंतर्मनाच्या दुधारी शक्तीमुळे आपण आपल्या जीवनाच्या
योग्य किंवा अयोग्य जीवनाचे शिल्पकार होउ शकतो. माणसाचं जीवन घडविण्याची किंवा बिघडवण्याची अगाध शक्ती अंतर्मनात असते. अंतर्मनाच्या महाशक्तीला कसं हाताळायचं हे संपुर्णपणे व्यक्तीवर अवलंबून असल्यामुळे त्यासाठी योग्य तंत्र शिकून घेण आवश्यक आहे. अंतर्मनाला योग्य सूचना देता आल्या तर ते एक ईश्वरी वरदान ठरेल. जे मानवाचे हातात, मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरेल.
‘सार्स’ या महाभयंकर रोगावरही एडस, कॅन्सर, डेंग्यू, कोरोना प्रमाण औषध उपलब्ध नाही. तरीही सार्स रोगावर नियंत्रण आणणं इच्छाशक्तीच्या आधारावर शक्य झालं. कोरोनावरही शारीरीक रोगप्रतिकार यंत्रणनेच नियंत्रण आणलं.