संमोहनाचे काही साईड इफेक्ट्स असतात का?
हे समजण्यासाठी प्रथम ‘संमोहन अवस्था म्हणजे काय?’ हे प्रकरण वाचा.
एक साधा प्रश्न आहे, मानसिक विश्रांतीचे किंवा शारीरिक विश्रांतीचे काही साईड इफेक्ट्स असतात का? विश्रांती मुळे व्यक्तीला नवीन ऊर्जा मिळते. बळ मिळते. ताजतवानं वाटतं. फ्रेंश वाटतं.
अगदी तसंच, संमोहन ही एक मनाच्या विश्रांतीची अवस्था आहे. या अवस्थेत जाणारा व्यक्ती अर्ध्या तासात आठ तासांची झोप घेतो. एवढी प्रगाढ व जलद विश्रांती या अवस्थेत व्यक्तीला मिळते. संमोहन अवस्था संसारी व्यक्तीला सुद्धा समाधी अवस्थेची अनुभुती देते. संमोहन हे मानवी जीवनासाठी आज वरदान ठरलं आहे.
आज संमोहन उपचारास जागतिक आरोग्य संघटना, भारत सरकार, अनेक वैद्यकीय तज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैज्ञानिक हे संमोहन उपचारास समाजोपयोगी शास्त्र म्हणून संबोधित आहेत. आज अनेक ॲलोपॅथी डॉक्टर सुद्धा संमोहन उपचाराचं महत्त्व त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रसिद्ध करीत आहेत.
परंतु काही अज्ञानी लोक संमोहनाबद्दल याचं-त्याचं ऐकून गैरसमज करुन घेतात. यात काही तज्ञ लोक, संमोहनाचा द्वेष करणारे लोक, ज्यांना वाटतं संमोहनामुळे आपल्या व्यवसायावर गदा येईल, असे लोक संमोहनाबद्दल नकारात्मक बोलताना दिसतात. परंतु सुर्याला कितीही झाकलं तरी त्याचा दैदिप्यमान प्रकाश रोखू शकत नाही. तसंच संमोहन हे आज मानवी उत्क्रांतीच्या महत्त्वाच्या टप्प्यात मानव जातीचं कल्याण करणार शास्त्र म्हणून पुढे आले आहे. त्याला कोणीही झाकाळू शकत नाही.
एकूण संमोहन अवस्था ही मानव जातीसाठी कल्याणकारी आहे. मानसिक विश्रांतीची अनमोल भेट आहे. जी तुमचं जीवन फुलवण्याचं सामर्थ्य अंगी बाळगते.