संमोहन उपचार कोर्स प्रक्रिया व प्रोसेस
संमोहन उपचार प्रक्रिया ही नागरिकांच्या डिमांड(मागणी) नुसार ग्रुप सेसन व वैयक्तिक सेसन अशी दोन प्रकारे चालवली जाते. संमोहन उपचाराचे (हिप्नोथेरपी) किती सेशन करावे लागतील? उपचार किती दिवस घ्यावा लागेल? हे व्यक्तीच्या समस्यांवर डिपेंड (अवलंबून) राहते. शक्यतो हिप्नो-थेरपीचं स्वरुप ही ऑफलाईन राहते. यामध्ये मानसिक सुसंवाद, मानसिक प्रभाव, मानसिक स्वीकार्यता सहज शक्य होते. अनेक सुशिक्षित लोक परजिल्हा, परराज्य व परदेशातून सुद्धा सरांकडे ऑफलाईन सेसन घेण्यास येत असतात. संमोहन उपचारांमध्ये किमान सुरुवातीचे एक सेसन ऑफलाईन होणं, हे तात्काळ व अधिक परिणामांसाठी अत्यावश्यक मानलं जातं. परंतु एकदाही सेंटर येणे शक्य नसल्यास, विशिष्ट नियम व अटी मध्ये हिप्नोथेरपीचे ऑनलाईन सेसन घेतले जातात. यामध्ये १) एकांत खोली, २) शांत वातावरण, ३) मंद प्रकाश, ४) मंद साऊंड इ. बाबी महत्वपूर्ण असतात. ऑनलाईन हिप्नोथेरपी सेसनचे सुद्धा तेवढ्याच ताकदीने परिणाम जाणवतात. रिझल्ट मिळतात.
संमोहन उपचाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे संमोहन कर्त्याची ‘सुचना’ व्यक्तीच्या अंतर्मनात जाणं. हे काम जेवढ्या अधिक परिणामकारकपणे साधता येईल तेवढ संबंधित व्यक्ती व रिझल्ट साठी आवश्यक ठरतं. त्यामुळेच किमान पहिलं एक हिप्नोथेरपी सेशन सेंटर ला ऑफलाईन होणं आवश्यक मानलं जातं. कारण सेंटर मध्ये तसं सायकॉलॉजीकल, भौतिक, तांत्रिक वातावरण आवर्जून निर्माण केलेलं असतं. पहिल्या सेशन नंतर मात्र कधीही, कुठेही, व्यक्तीच्या जागेपणी सुद्धा लोंढे सरांच्या सुचना व्यक्तीच्या अंतर्मनात जाऊन व्यक्तीच्या मनात व शरीरात अपेक्षित बदल, सुधारणा व परिवर्तन घडवून आणू लागतात.
संबंधित व्यक्तीला किती सेसन घ्यावे लागतील? उपचार किती दिवस घ्यावा लागेल? हिप्नोथेरपी किटची घरी किती दिवस प्रॅक्टिस करावी लागेल? हे व्यक्तीच्या समस्यांवर डिपेंड (अवलंबून) राहते. यामध्ये २ सेशन, ४, ७, १२, १८, २४ सेशन पर्यंत मागणी व गरजेनुसार सेशन दिले जातात. हे सेशन ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे दिले जातात. प्रत्येक सेशन मध्ये किमान ७ दिवसांचा गॅप असतो. कारण तेव्हाच निरिक्षण प्रक्रिया करता येते. शक्यतो अनेकजण दूरचे लोक सुद्धा सगळे सेसन ऑफलाईन सेंटरला करतात. तर दुरचे व्यक्ती प्रथम सेशन सेंटर ला ऑफलाईन घेऊन बाकीचे सेशन ऑनलाईन करतात. ज्यांना शक्य नाही ते सर्वच सेसन ऑनलाईन करतात.
हिप्नोथेरपी किट :
१) संबंधित व्यक्तीच्या प्रोब्लेम नुसार “हिप्नोथेरपी ऑडिओ रेकॉर्डिंग” (२० मिनिटे).
रेकॉर्डिंग सकाळी झोपून ऐकणे.
२) संबंधित व्यक्तीच्या प्रोब्लेम नुसार लोंढे सरांनी लिहून दिलेल्या ‘स्वयसुचना’ व त्या घेण्याची सिक्रेट मेथड (५-१० मिनिटे).
– सेल्फ सजेशन सायंकाळी घेणं.