संमोहन उपचार कोणाकडे घ्यावा?
– संमोहन उपचारामध्ये संमोहन अवस्था निर्माण करणं, रिझल्ट देणं व ते रिझल्ट कायमस्वरूपी टिकवून ठेवणं, वाटतं तेवढी साधारण बाब नक्कीच नाही. विशेषतः मनुष्याच्या मानसिक व शारीरिक आंतरीक कार्यप्रणालीत बदल, सुधारणा व परीवर्तन घडवून आणण्यासाठी, व्यक्तीची आंतरिक बिलीफ सिस्टीम सकारात्मक व मजबूत बनवण्यासाठी, व्यक्तीच्या मानसिक, बौद्धिक, शारिरीक क्षमतांचा विकास करण्यासाठी, जुनाट मानसिक व शारीरिक आजारांवर मात करण्यासाठी हिप्नोथेरपी(संमोहन उपचार) उपयोगी पडते. हे कार्य वाटते तितके सोपे नाही. यासाठी संमोहन तज्ञाला अनेक वर्षे सखोल अभ्यास, इंटरशीप (चांगल्या तज्ञाकडे), अनुभव, प्रामाणिकपणा व संशोधन वृत्ती ठेऊन काम करावे लागते. अन्यथा एक अर्धवट संमोहन तज्ञ कोणाचही भलं करु शकत नाही. नवशिक्या, अर्धवट व गल्लीबोळातील संमोहन तज्ज्ञांच हे काम नाही. परिपक्व होऊन लोकांचं कल्याण करण्यासाठी, तेवढा वेळ व बुद्धी त्या क्षेत्रात खर्ची घालवावी लागते. तेव्हाच तो तज्ञ लोकांना रिझल्ट्स देऊ शकतो. अन्यथा नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. माझ्याकडे बरेच लोक इतर नामांकित संमोहन तज्ज्ञाकडे जाऊन आलेले येतात. रिझल्ट न आल्याने संमोहनशास्त्राबद्दल निगेटिव्ह झालेले आढळतात. याचं मला खुप दुःख होतं. संमोहनाचे फायदे भरपूर व परिणामकारक असतात. परंतु त्यासाठी तज्ञ सुद्धा तेवढाच ताकदीचा हवा. सुशिक्षित लोक सुद्धा खुप मोठ्या भ्रमात असतात. त्यांना वाटतं, ‘मोठी जाहिरात, मोठं ऑफिस, टिव्ही चैनल इ. म्हणजे मोठा तज्ञ आहे. परंतु त्यापेक्षा संबंधित तज्ञांचे रिझल्ट, लोकांचे फिडबॅक, त्याचा अभ्यास, त्याचा अनुभव, त्याची सर्व्हिस इ. कशी आहे, हे पडताळणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्यासाठी योग्य तज्ञ निवडू शकाल.
संमोहन उपचारामध्ये दोन बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. १) संमोहन अवस्था निर्माण करणे. २) अंतर्मनाला रिप्रोग्रॅम करणे. हो, संमोहन अवस्था निर्माण करणं, हा संमोहनाचा पहिला साधारण टप्पा झाला. परंतु संबंधित व्यक्तीची वैयक्तिक समस्या काय आहे? ती कशामुळे झाली आहे? आणि त्यावर कायमची मात करण्यासाठी कोणते धारणात्मक व भावनात्मक बदल करावे लागतील? व ते कसे करावे लागतील? हा दुसरा टप्पा रिझल्ट येण्यासाठी व ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
अंतर्मनाला रिप्रोग्रॅमिंग करणं म्हणजे व्यक्तीच्या प्रोब्लेम नुसार, काम करणे. हे व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक कार्यप्रणालीच सॉफ्टवेअर असतं. त्यात असंतुलन व बिघाड झाल्यामुळेच विविध समस्या निर्माण झालेल्या असतात. मनातील धारणा, भावना, दृष्टिकोन, कार्यप्रणाली इ. नकारात्मक व कमजोर झालेली असते. त्यामुळे मानसिक समस्येमध्ये व्यक्तीचं मन भयभीत होऊन ओव्हर व निगेटिव्ह थिकींग करु लागते. सोबत इतर ही मानसिक समस्या वाढत जातात. तर शारीरिक आजारांबाबत दैनंदिन तणावामुळे शरीराच्या आंतरिक यंत्रणा कमजोर होऊन नकारात्मक धारणात्मक कार्यप्रणाली चा भाग बनून जातात.
अशा परिस्थितीत अंतर्मनाला रिप्रोग्रॅमिंग करण्यासाठी संमोहन शास्त्रासोबतच, सुचना शास्त्र(सुचनांचा प्रवास, सुचनांची स्वीकार्यता, सुचनांचे स्तर, सुचनांचे प्रकार इ) यांचाही अभ्यास अत्यावश्यक ठरतो. त्याशिवाय संमोहन उपचाराद्वारे रिझल्ट देणं व ते टिकवून ठेवणे शक्य होत नाही. अपेक्षित रिझल्ट साठी संमोहन तज्ञ तेवढाच ताकदीचा हवा.