प्रश्न आणि उत्तरं
प्रश्न : मला संमोहन उपचार करून घ्यावयाचे आहेत; पण संमोहनाविषयी भीती वाटते.
उत्तरः संमोहन ही शुद्ध नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात भीती वाटण्यासारखं असं काहीही नाही. संमोहन उपचारक मात्र जाणकार असावा.
प्रश्नः संमोहनशक्तीनं इतरांच्या मनातील जाणता येतं का ?
उत्तर : याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
प्रश्नः संमोहित व्यक्तीला अंतर्मनाच्या शक्तीनं लांबच्या गावातील, शहरातील, घरातील दिसू शकत का ?
उत्तरः याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
प्रश्नः संमोहनाविषयीची शास्त्रीय माहिती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोचण्यासाठी आपण आणखी काय काय उपक्रम हाती घेत आहात ?
उत्तर : त्यासाठी ठिकठिकाणी संमोहन उपचार एक वरदान या विषयावर मी व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकं आयोजित करीत असतो. संमोहनशास्त्रावर आधारित द सिक्रेट ऑफ सक्सेस हा आश्चर्य, विज्ञान आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम असणारा स्टेज शोसुद्धा मी सादर करीत असतो.
प्रश्नः संमोहन उपचारांचे परिणाम कायम टिकून राहतात का ?
उत्तरः अर्थातच !
प्रश्न : रुग्णाला आजार घालविण्यासाठी किती वेळा यावं लागतं ?
उत्तर : फक्त एकदाच एकाच दिवसाची कार्यशाळा करावी लागते; मात्र घरी नंतर स्वयंसूचना नियमितपणे घेणं व दिलेली हिप्नोथेरपी ऑडिओ रेकॉर्डिंग नियमितपणे ऐकणं (ठराविक दिवस) गरजेचं असतं. परत यायची गरज पडत नाही.
प्रश्नः संमोहनानं शारीरिक व्याधीसुद्धा बऱ्या होतात का ?
उत्तरः संमोहनानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे औषध गोळ्या रुग्णास अधिक प्रमाणात लागू पडतात, म्हणून आजार पटकन बरा होण्यास मदत होते. शारीरिक आजारसुद्धा संमोहन उपचारानं बरे होतात.
प्रश्न : संमोहन आपण शिकविता का ?
उत्तर : हो ! स्वसंमोहन उपचार व परसंमोहन उपचार दोन्ही प्रशिक्षण आमच्या नोंदणीकृत सेंटरच्या अंतर्गत दिले जाते. माझ्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेत स्वसंमोहनाच्या बऱ्याच वेगवेगळ्या, सोप्या, कमी वेळेच्या व जास्त फायदेशीर पद्धती यांचा समावेश झालेलाच आहे..
प्रश्न : संमोहनानं खरोखरच स्मरणशक्ती वाढते का ?
उत्तरः स्मरणशक्ती निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी दिलेली नाही. स्मरणशक्ती म्हणजे माहिती, ज्ञान साठविण्यासाठी निसगीनं प्रत्येकाला दिलेलं एक अमीद असं भांडार असतं. त्यात काय काय साठवायचं, हे तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून असतं. पुन्हा स्मरणशक्तीच्या भांडारातून ते आठवण्यासाठी म्हणजे ते रि कॉल करण्यासाठीही एकाग्रतेची आवश्यकता असते. संमोहनान एकाग्रता वाढविता येते, म्हणजेच स्मरणशक्ती आपोआपच वाढते.
प्रश्नः मला हस्तमैथुनाची प्रमाणापेक्षा जास्त सवय आहे. डॉक्टर म्हणतात, ‘ते नैसर्गिक आहे. त्यात कुठलंही नुकसान नाही’; पण माझी एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, झोप, जेवण सगळंच कमी- कमी होत चाललं आहे. संमोहन उपचारांचा फायदा होईल का ?
उत्तरः प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुनाची सवय असल्यास वरीलप्रमाणे त्रास होणं साहजिकच आहे. तुम्हाला माझ्या संमोहन उपचारांनी अवश्य फायदा होईल, हस्तमैथुनाचा अतिरेक टाळून मानसिक, शारीरिक आरोग्याचं स्वास्थ्य परत मिळेल.
प्रश्न : मला कुठलाही आजार नाही. मग संमोहन उपचारांचा काय फायदा ?
उत्तर : निरोगी असाल, तर कायम निरोगी राहण्यासाठी संमोहन उपचार आपल्यासाठीही फायदेशीर ठरतील. संमोहनानं एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, आकलनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती, इच्छाशक्ती बाढते. हे सर्व आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
प्रश्नः माझे पती नेहमी चिडचीड करतात. त्यामुळे घरातील सगळी मुलं व मी कायम तणावाखाली असतो. मी काय करू?
उत्तरः तुमच्या पतींना क्लिनिकमध्ये घेऊन या. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या चिडचिडेपणानं त्यांना व तुम्हाला होणारा त्रास त्यांच्या लक्षात आणून देऊन संमोहन उपचारांनी त्याच्या स्वभावात बदल घडवून आणता येईल.
प्रश्न : आत्मसाक्षात्कार खरोखर होतो का ?
उत्तर : नाही. ते स्वसमोहन असतं. माझ्या द सिक्रेट ऑफ सक्सेस या कार्यक्रमात मी स्टेजवर प्रेक्षकांतील काहींना बोलावून त्याविषयीची प्रात्यक्षिकसुद्धा दाखवीत असतो. त्यानंतर बरेच जण मला भेटून त्यांचे त्याविषयीचे गैरसमज दूर झाल्याचं सांगत असतात. संमोहन उपचार एक बरदान या माझ्या व्हीडिओ त सुद्धा याबाबतची वैज्ञानिक प्रात्यक्षिकं आपणास बघता येतील.
प्रश्नः पूजाअर्ची-प्रार्थना यांचा फायदा होतो का ?
उत्तर : तुम्ही आस्तिक असाल, तर अवश्य फायदा होतो. त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास, पॉझिटिक थिंकिंग वाढतं व त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणून मानसिक व शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.
प्रश्न : आपण आस्तिक आहात की नास्तिक ?
उत्तरः मी आस्तिक (वास्तविक) आहे; मात्र देवाच्या नावावर चालणाऱ्या बुवाबाजीला माझा तीव्र विरोध आहे.
प्रश्नः माझे पती दारूपितात. दारू सोडण्याची त्यांची इच्छाच नाही. प्रयत्न, इलाज करूनही दारू सुटली नाही, म्हणून ते कुठलाही इलाज करून घ्यायला आता तयार नाहीत.
उत्तरः त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन या. आधी त्यांची दारूसोडण्याची इच्छा आपण निमर्माण करू.. त्यानंतर संमोहन उपचारांनी दारूसुद्धा कायमची सोडवता येईल..
प्रश्न : मला एड्सची लागण होईल, अशी भीती वाटते. कधी कधी तर मला एड्स झालाय, असंच वाटायला लागतं. तशी लक्षणंही जाणवू लागतात, तर तीन महिन्यांनी मी एच. आय. व्ही. टेस्ट करून घेत असतो. दर वेळी रिपोर्ट नॉर्मल असतात; पण मनातील भीती जात नाही. आपल्या संमोहन उपचारांनी ही भीती घालविता येईल का ?
उत्तर : माझ्या संमोहन उपचारांनी सर्वच आजारांबद्दलची सर्वच प्रकारची भीती घालविता येते.
प्रश्नः माझा एक मित्र सहा महिन्यांपूवी हार्ट अटैक वारला. त्या दिवसापासून मलाही हार्ट अटॅक येईल की काय, असेच विचार नेहमी मनात सुरू असतात व मला सारखी भीती वाटत असते. खूप पैसा खर्च केला, औषधोपचारांनी फायदा झाला नाही. असं का ?
उत्तर : जसे आपले विचार, तसे आपले अनुभव, हार्ट अटॅकचे विचार असेच सुरू राहिले, तर तुम्हाला निश्चितच हार्ट अटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या या समस्येची मुळ तुमच्या अंतर्मनात असल्यामुळे तुम्हाला औषधोपचार लागू पडले नाहीत. त्यासाठी तुम्ही माझी संमोहन उपचारांची कार्यशाळा करणंच गरजेच आहे.
प्रश्नः माझा मुलगा खूप हुशार आहे; परंतु गेल्या एक महिन्यापासून तो कॉलेजला जात नाही. त्याच्यावर
रॅगिंग झाल्याचा आम्हाला संशय येतो; परंतु तो त्याबाबतीत काहीच बोलत नाही, आम्ही काय करावं ?
उत्तर : रॅगिंग-एक अमानुष प्रकारफ, याच पुस्तकातील हे प्रकरण वाचा.
प्रश्नः मला कमी ऐकू येत. नीट ऐकू येण्यासाठी कार्यशाळेचा फायदा होईल का ?
उत्तर : कार्यशाळेत शरीरातील सगळ्याच संस्थांच्या, पेशींच्या, स्नायूंच्या अवयवांच्या कार्यक्षमता वाढतात. त्यामुळे तुमच्या यंत्रांची कार्यक्षमता वाढवून ऐकण्यामध्ये निश्चितच सुधारणा घडवून आणता येईल.
प्रश्न : व्हेरीकोज व्हेन्स, पॅरालिसिस, कॅन्सर, एड्स…. अशा प्रकारच्या समस्यांमध्ये आपल्या संमोहन उपचारांचा फायदा होतो का ?
उत्तर : संमोहन उपचारांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे वैद्यक क्षेत्रातल्या उपचारांसोबतच संमोहन उपचार एक पूरक उपचार पद्धती म्हणून वापरल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.
प्रश्नः मला बरेच मानसिक; तसेच विविध शारीरिक त्रास आहेत. संमोहन उपचारांच्या एकाच कार्यशाळेत सगळेच त्रास दूर होतील का ?
उत्तर : निश्चितच ! तुमच्या अंतर्मनात तेवढं सामर्थ्य आहे. तुमचं अंतर्मन तुम्हाला निश्चितच सगळ्या त्रासांमधून बाहेर काढेल, मी फक्त तुमच्या अंतर्मनात योग्य पद्धतीनं योग्य त्या सूचना पोचविण्याचं काम करेल.
प्रश्न : माझ्या एका मित्राला आपल्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेचा खूप फायदा झाला. माझीसुद्धा आपल्या कार्यशाळेत भाग घेण्याची इच्छा आहे; परंतु आमचे फॅमिली डॉक्टर समोहनाबाबत नकारात्मक बोलतात.
उत्तर : तुमचे फॅमिली डॉक्टर संमोहनतज्ज्ञ आहेत का ? संमोहनावर त्यांचा कुठलाही अभ्यास नसताना त्यांची संमोहनाबाबतची भूमिका नकारात्मक असली, तरी संमोहनाचं ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीला संमोहनाबाबत माहिती विचारणं तुमची पण चूक आहे. रत्नाची पारख करण्यासाठी रत्नपारखीच हवा आणि विशेष म्हणजे तुमचा मित्र पण आमच्या उपचारांनी बरा झाला मग तुम्ही कशाला बाट बघता ? लगेचच कार्यशाळेत भाग घ्या. या पुस्तकातील विविध वैद्यकीय, वैज्ञानिक व शास्त्रीय आधार पाहून घ्या. हे पुस्तक तुमच्या फॅमिली डॉक्टरांना वाचायला द्याव. माझा संमोहनावर आधारित दीड तासाची व्हिडिओ लिंक पण त्यांना बघायला द्या म्हणजे संमोहनाबाबतचं त्यांचं अज्ञान दूर होऊन तेही निश्चितच सकारात्मक बनतील.
प्रश्नः डोळ्यांत बघून संमोहित करता येतं का ? संमोहनानं लुटता येतं का ?
उत्तर : तुमच्या इच्छेविरुद्ध डोळ्यांत बघूनच काय पण कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला कुणीही संमोहित करू शकत नाही.
प्रश्न : कार्यशाळेत भाग घेण्यासाठी वयाची अट काय ?
उत्तर : वय शक्यतो दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावं. थोडक्यात, संमोहनतज्ज्ञाच्या सूचनांना प्रतिसाद देऊ शकणारी व्यक्ती असावी.
प्रश्नः मी सध्या वैद्यकक्षेत्रातल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध-गोळ्या घेत आहे. अपेक्षित फायदा नाही. आपली कार्यशाळा केल्यावर माझ्या औषध-गोळ्या बंद होतील का?
उत्तर : माझ्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेचे आपणास निश्चितच फायदे होत राहतील. जसजसे फायदे होत जातील, तसतसे संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषध गोळ्यांचे डोस कमी करत जावेत.
प्रश्नः मी आजपर्यंत दोन-तीन संमोहन उपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतलेत, अजिबात फायदा झाला नाही. आपल्या संमोहन उपचारांचा फायदा होईल का?
उत्तर : संमोहन हा खूप फायदेशीर विषय असला, तरी संमोहनाचा वापर करणारा संमोहनतज्ज्ञसुद्धा तेवढाच ताकदीचा हवा. जाणकार, अभ्यासू, अनुभवी, संमोहनतज्ज्ञच योग्य उपचार करू शकतो. तेथे पाहिजे जातीचे ! गल्ली बोळातल्या, नवशिक्या, स्वतःला संमोहनतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या ऐऱ्यागैर्याचे ते काम नव्हे.