वेदना रहित प्रसुती व संमोहन

प्रत्येक आईला आता एक गिफ्ट द्या, वेदना रहित प्रसुती.

– वैदयकीय क्षेत्रातील उपचार व संमोहन उपचार

लेबर पेन अर्थर्थात प्रसुती बेदना यापेक्षा वेदनादायक या जगात काहीच असू शकत नाही. असं म्हटलं जात की, जेवढ्या वेदनेनं एखादा पुरुषाचा मृत्यु होउ शकतो. त्याच्या तीनपट अधिक वेदना स्त्रीला प्रसुती दरम्यान सहन कराव्या लागतात. गरोदरपणाचा काळ सुरू झाल्यावर स्त्रीला सर्वर्वाधिक भीती वाटत असते ती डिलिव्हरीची !

या भिती मागंच कारणं असत बदेना ! स्त्रीच्या लहानश्या योनी मार्गातून एक जीव जन्म घेतो, बाहेर येतो, तेव्हा स्त्रीला मरणप्राय वेदना होत असतात. या भयानक वेदनांचा बाळाच्या आरोग्यावर ही अप्रत्यक्षरित्या विपरीत परीणाम होत असतो. प्रत्येक स्त्रीच्या मनात पहिल्या गरोदरपणाच्या वेळी या वेदनांची मिती बसलेली असते. याच भितीमुळे आईचा रक्तदाब व शुगर वाढत असते. आईच्या आरोग्याचा, तिच्या मानसीक ताणांचा बाळाच्या आरोग्यावर परीणाम होतो. आईचा रक्तदाब उच्च राहिल्यास कधी-कधी बाळ करपून सुध्दा जातं. वेदना रहित प्रसुतीच्या साहायाने आईला वेदनामुक्त, मितीमुक्त, टेंशनमुक्त व सक्षम बनवू शकतो. प्रत्येक आईला एक गिफट देउ शकतो – वेदना रहित प्रसुती.

– वैदयकीय क्षेत्रातील उपचार-साईड इफेक्ट व संमोहन उपचार :

आज वैदयकीय क्षेत्रामध्ये प्रसुतीमधील वेदनांवर उपाय आहे. एपिडयूरल ब्लॉक हे एक टयूब सारखे उपकरण आहे. जे पाठीवर लावले जाते. हे औषध, वेदना मेंदूपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांना रोखण्याचं काम करतं. इंजेक्शन लावल्यावर पोट व जवळच्या भागात काहीच वेदना जाणवत नाहीत. तो तिचा भाग काही काळासाठी पुर्णपणे संवेदनहीन होतो. मात्र ती बेशुध्द होत नाही. या औषधाच्या रासायनिक प्रक्रियेमुळे काहींना खाज सुटते. ओपोइड वेदना शामक औषधामुळे पोटात मळमळ होउ लागते. पोट खराब होउ शकते. पोटाच्या समस्या वाढू शकतात. लो ब्लड प्रेशर (रक्तदाब कमी) चा धोका निर्माण होउ शकतो. या औषधाचा वापर केल्यानंतर १४ टक्के महिलांना हा धोका संभावतो. तसेच श्वास घेण्यात समस्या व डोकदुखीचा त्रास होउ शकतो. या अशा विविध कारणांमुळे या औषधाचा किंवा ट्यूबचा वापर कमीच केला जातो.

परंतु आनंदाची बातमी अशी असे कोणतेही साईड इफेक्ट न देता, सुध्दा संमाहनाव्दारे तो विशिष्ट माग बधीर करता येतो. आणि त्यासाठी महिलेला प्रसुतीच्या वेळी संमोहन करण्याची गरज नाही. आईलाच स्वसमोहन टेकनीक्स शिकवून किंवा प्रसुतीच्या अगोदर आईच्या अंतर्मनात सुचना पाठवल्या की, ‘प्रसुतीच्या वेळी, प्रसुती होईपर्यंत तुमच्या कंबरेखालील अवघड जागा पुर्णपणे बधीर होउन जाईल’ किंवा ‘ प्रसुतीच्या वेळी तुमचा कंबरेखालील भाग पुर्णपणे बधीर होउन जाईल’ अशा सुचना पाठविल्यास सुध्दा संमोहन किंवा स्वसंमोहन टेकनीक्स न वापरता सुध्दा अंतर्मनात पाठवलेल्या सुचनेप्रमाणे प्रसुतीच्या वेळी आईची ती जागा आपोआप बधीर होउन जाते. जागतीक आरोग्य संघटना म्हणते, ‘संमोहनाव्दारे प्रसुतीच्या वेदनांवर मात करता येउ शकते’. तसेच वैदयकीय क्षेत्रातील संखोल अभ्यासक डॉ विवेक शास्त्री म्हणतात, ‘संमोहनाव्दारे बदेनारहित प्रसुती शक्य आहे’. अर्थात संमोहनाव्दारे वेदनारहित प्रसुती यास वैज्ञानिक व वैदयकीय आधार सुध्दा आहे. आपल्या बाळाचं व आईच आरोग्य सुरक्षित करण्यासाठी, आईला वेदनामुक्त प्रसुती गिफ्ट देण्यासाठी संमोहन प्रत्येक आईला मदत करु शकतं.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×