गर्भधारणेचा काळ व बाळाचे अंगभुत सामर्थ्य + कलागुण + कौशल्य

हे प्रकरण वाचण्यापूवी ‘जीवनाला शरीराला आकार देणारं शस्त्र – स्मृती’ हे प्रकरण वाचावे

आपण सर्वजण हे जाणतोच की, जन्मणाऱ्या बाळामध्ये अनुवंशिकता आढळते. यामध्ये शारीरीक व मानसीक अशा दोन प्रकारच्या अनुवंशिकता असतात. शारीरीक अनुवंशिकता साधारणतः ६० टक्‌यापर्यंत आढळते. तीच काही ठिकाणी दुर्मिळतेने ९५ टक्‌यापर्यंत आढळते. एखाद बाळ, त्याच्या पिढीतील एखादया व्यक्तीसारखं हुबेहुब दिसते. परंतु मानसीक सामयींची अनुवंशिकता फारशी आढळत नाही. कारण जो जीवनात काहीच करू शकला नाही. त्याचा मुलगा जीवनात मोठयातलं मोठं यश संपादन करतो. एखादा बाप स्वभावाने खुप गरीब असतो. परंतु मुलगा खुप धाडसी निघतो. एखादयाच्या अनेक पिढयांनी अठराविश्व दारिद्रय भोगलेलं असतं. असा मुलगा करोडपती, अरबपती बनतो. जगासमोर अशी अनेक जीवंत उदाहरणं आहेतं. शाळेची घंटा वाजवणारा शिपाई, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन बनला, पेपर वाटण्याचं काम करणारा, जगातील सर्वाधिक श्रीमंत बील गेट्स बनला, पेट्रोल पंपावर काम करणारा, जागतीक स्तरावरील उदयोगपती अंबानी बनला, गरीब निग्रो वंशाचा, जगप्रसिध्द सुपरस्टार मायकल जॅक्शन बनला. छोटया जहाँगिरदाराचा मुलगा, सुव्याख्यात छत्रपती शिवाजी राजा बनला. एक शाळेबाहेर बसून शिकणारा, जगतविव्दान डॉ भिमराव आंबेडकर बनला. कुलीचं काम करणारा, कलेतील देवता सुपरस्टार रजनीकांत बनला. रिक्षा चालवणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला, चाय विकणारा पंतप्रधान बनला, अशी कितीतरी वास्तव उदाहरणं आपल्याला देता येतील. गरीब, दारिद्र, अपयश, साधारण कुटुंबातील मुलांची मानसीकता मात्र उंच भरारी घेण्याची, काहीतरी करून दाखवण्याची, स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची, जगावर आपल्या सामथ्यनि छाप टाकण्याची, मोठ्यातल मोठ यश पादांकित करण्याची जिद्द त्यांच्या नसानसात होती.

त्यांच्या व्यक्तीमत्वात जी प्रगल्भता नावीन्यता-धमक कौशल्य-कार्यक्षमता-कुशलता होती. ती त्यांच्या पुर्वीच्या पिढीत नव्हती. मग या यशस्वी व्यक्तीमध्ये हे सामर्थ्यशाली मनोधैर्य आले कोठून ? तर अशा सामर्थ्यशाली गुणांचे कोठेतरी बीजारोपण झालेलं असते. त्याचेचं पुढे जाउन महान वृक्ष बनते. ते बीजारोपण बऱ्याचवेळा आईच्या गर्भीत झालेलं असतं. केजीएफ फिल्ममध्ये एक गरीब कष्टकरी आई मरताना नायकाला म्हणते की, श्रीमंत व्यक्ती होउनच मर. अर्थातच त्या आईच्या गभर्भात ते बाळ असतानाच तिच्या मनात ते महान विचार होते. स्पार्टनमध्ये त्याकाळी अनेक महिला, माझ्या मायभुमीच रक्षण करण्यासाठी, माझ्या पोटी अत्यंत शुर-पराक्रमी शक्तीशाली बाळ जन्माला येवो, अशी धारणा व प्रार्थना देवाला करायच्या. त्याकाळी एक स्पार्टन सैनिक १०० सैनिकांना मारण्याची क्षमता अंगी बाळगून असायचा. फक्त ३०० स्पार्टन सैनिकांनी शत्रुच्या लाखोंच्या सैनिकांना मारले होते. अनेक वर्ष त्यांना अडवून धरले होते. याची नोंद आपणास इतिहासात आढळते. शहाजीराजे जिजाउंना म्हणाले, माझी जहाँगिरी संभाळण्यासाठी मला शुर-पराक्रमी मुलगा पाहिजे तेव्हापासून जिजाऊंच्या मनात गुणसामर्थ्यीचं बीजारोपण सुरूझाले.

अर्थात बाळाची आई गरीब असो किंवा श्रीमंत असो. तिच्या मनातील बाळाविषयीची धारणा व भावना सकारात्मक होणं गरजेची आहे. मनात फक्त विचार चांगले येउन उपयोग नाही. त्याला जोपर्यंत धारणा व भावनेची शक्ती मिळत नाही. तोपर्यंत विचार हे शक्तीहीन असतात. त्या चांगल्या विचाराला साथ देणारी मनात, तशी धारणा व भावना असणं महत्वाच आहे. परिस्थितीमुळे जी मनात धारणा व भावना तयार होते. तशी धारणा फक्त विचाराने निर्माण होत नाही.

आपल्या समाजामध्ये गिरणात (ग्रहणामध्ये) बाधीत मुलं पाहण्यास मिळतात. काहीजणांचा होट चिरलेला असतो, कोणाचा कान कापलेला असतो. माझ्या परिचयात एकाचा होट चिरलेला, एकाचे दोन्ही कान कापलेले, एकाला जन्मतःच गुद नसलेलं मुलं आहे. त्यांचा मी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या आईन सांगितलं की, गिराण लागलेलं मला माहीतच नव्हत, ते मला नंतर कळाल. गिराण काळात मी वांग चिरत होते, मी भाजी चिरत होते म्हणून त्याचा होट चिरला, त्याचं दोन्ही कान जन्मतःच कापल होतं. एकीनं सागितलं, “मी मिताड लिपत होते, म्हणून बाळाचं गुद लिपलं गेल”. अर्थीत गर्भधारणेच्या काळात आईच्या मनात निर्माण झालेली ग्रहणाची मिती व जुनाट नकारात्मक धारणा ही गर्भातील बाळाच्या शरीररचनेवर सुध्दा परीणाम करते. कारण त्यानंतरच्या बाळांना ग्रहण पाळल्यामुळे कोणतच अपंगत्व आलं नाही. परदेशात कोणीही ग्रहण पाळत नाही. मग त्यांची सर्व बाळं ही अपंग जन्मतात का ? माझ्या सुध्दा दोन्ही बाळांच्या वेळी मी मुददाम ग्रहण पाळू दिलं नाही. परंतु दोन्ही ही बाळ शारीरीक दृष्ट्या सशक्त व अत्यंत हुशार निघाली. अर्थात समाजामध्ये अशा अनेक अधश्रध्दाळू नकारत्मक धारणा रूजल्या आहेत. त्याबाबत जागरूकता येणं, काळाची गरज आहे. परंतु अशा जुनाट धारणा व्यक्तीच्या शरीरावर, मनावर व जीवनावर किती खोलवर परिणाम करतात, याची आपणास प्रचिती येते. अनुभव येतो. आजकाल गर्भधारणेच्या काळात अनेक महिलांचा रक्तदाब वाढतो. शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं तसेच घरातील मतभेद, बादविवाद, टेंशन, मानसीक ताण, राग, चिडचिडपणा इ. चासुध्दा गर्भातील बाळाच्या मानसीक अनुवंशिकतेवर खुप मोठा परीणाम होत असतो.

संमोहन उपचारव्दारे डायरेक्ट अंतर्मनातून आईची बाळाबाबत संकल्पना, धारणा व भावना उच्चतम सकारात्मक बनवता येते. आईचा गर्भधारणेच्या काळात वाढणारा रक्तदाब, शुगर यांना नियंत्रीत करता येते. गर्भधारणेच्या काळात मानसीक ताण येणार नाहीत. मन प्रसन्न, शांत व सकारात्मक राहिल. अशी व्यवस्था करता येते. आईचं व बाळाचं मनोधैर्य वाढवता येतं. संमोहनाव्दारे आईच्या अंतर्मनामध्ये बाळासंबंधित विविध क्षमता, सामर्थ्य, कला कौशल्य, प्रगल्भता, कार्यक्षमता, कुशलता, बुध्दीमत्ता इ.. गुण विकसीत होण्यासंदर्भात सुचना पाठवता येतात. त्याचे सकारात्मक परीणाम होतात. या संदर्भात “जीवनाला व शरीराला आकार उकार देणार शस्त्र स्मृती” हे प्रकरण आवश्य वाचा. या प्रकरणात या संदर्भातील रिझल्ट मांडले आहेत. अशा पध्दतीने गर्भधारणेच्या काळात जर संमोहनाव्दारे आईच्या बाळाविषयीच्या संकल्पना, प्रतिमा, धारणा, भावना सकारात्मक बनवल्या तर बाळाच्या मानसीक व शारीरीक क्षमतेवर साहजीकच सकारात्मक परीणाम दिसून येतो.. आपल्या जन्मणाऱ्या बाळाचे भवितव्य उज्वल बनवण्यासाठी हाच गर्भधारणेचा काळ सर्वाधीक परीणामकारक व सोयीस्कर सुध्दा आहे. अनेकजण म्हणतात, जन्मतःच हुशार आहे, जन्मापासूनच रागीट आहे. भांडकुदळ आहे, तंदरूस्त आहे, अशक्त आहे. शांत आहे. बुध्दीमान आहे. यशस्वी होण्यासाठी बाळाच्या अंगी जन्मतःच सामर्थ्य असाव लागतं. जे सामर्थ्य गर्भर्भातच साध्य होउ शकते. तर विचार कसला कराताय ? बाळाचे एक सकारात्मक व प्रभावी व्यक्तीमत्व गर्भीमध्ये निर्माण करण्याची ही संधी गमावू नका. अशी संधी पुन्हा नाही.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×