लठठपणा एक आव्हान व संमोहन
आहार कमी केला तरी वजन कमी होत नाही. व्यायाम करून वजन कमी होत नाही. विविध औषधं घेतली तरी बनज तात्पुरतं कमी होतं. औषध बंद केली पुन्हा बनज वाढत. आणि फक्त वाढतच नाहीतर पहिल्यापक्षा दोन-पाच किलो जास्तच वाढत. अनेक जण येतात, मी अर्धीच भाकर खाते. मी एकच चपाती खाते. तरीही वनज कमीच होत नाही. काहीजण तक्रार करतात. पाच महिने औषध घेतली, महिन्याला १०-१२ हजार खर्च केले. औषध आहेत तोपर्यंत वजन कमी झालं खरं. परंतु पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वाढलं. आता काय आयुष्यभर औषधच खायची का? यावर कायमचा काही उपाय नाही का? वैदयकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉ विवेक शास्त्री म्हणतात, संमोहन उपचाराव्दारे लठठपणा नाहीसा होउ शकतो. खालील वृत्तमानपत्रातील बातमीत इंग्रजी मध्ये लिहीलं आहे, की तुमच्या विचारातच मेद आहे. आता या तज्ञांच्या विचारांमागे, बातमी मागे नेमका वैज्ञानीक दृष्टीकोन काय आहे? हे समजून घेण्यासाठी तुम्ही याच पुस्तकातील, ‘जीवनाला व शरीराला आकार देणारं शस्त्र- स्मृती. हे प्रकरण वाचा. तेव्हाच आपणास या लठ्ठपणावर मात करण्याचा मार्ग मिळेल. लठ्ठपणावर
कायमची मात करण्यासाठी तुम्हाला विविध मानसीक धोरणांची / बदलांची गरज असते. रोजच्या रोज व्यायाम करण्यासाठी, व्यायामात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, काही पदार्थांचा त्याग करण्यासाठी, मानसीक तयारीची गरज असते. अनेकजण म्हणतात, उदयापासून व्यायाम चालू करायचा, उदयापासून व्यायाम चालू करायचा. परंतु त्यांचा उदया कधीच येत नाही. आणि कसा बसा व्यायाम चालू केलाच तर आठ-पंधरा दिवस/महिनाभर करायचा अन सोडून दयायचा. काहींना तर व्यायाम चालू करणंच होत नाही. तर काहींना सातत्य टिकवता येत नाही. काहीजण आवडत्या पदार्थांचा त्याग करू शकत नाहीत. मनावर कंट्रोल ठेवू शकत नाहीत. यासाठी मनाला रिप्रोग्रॅम करण्याची अत्यंत गरज असते. जर मनाला रिप्रोग्रॅम नाही केल तर मनाला या गोष्टी टिकवून ठेवणं जमत नाही. परंतु आमच्या अशा काही केसेस आहेत. संमोहन उपचार चालू केल्यानंतर त्यांनी कोणताही व्यायाम न करता, डायट न करता सुध्दा त्यांच वजन नैसर्गिकरित्या कमी झाल्याचं आढळून आलं आहे. स्वतः माझीच पत्नी लग्ना अगोदर थोडी जाड होती. लग्न जमल्यानंतर तिला मी संमोहन उपचार चालू केला. तीन महिन्यानंतर आमचं लग्न झाल. तर तीन महिन्यात ती नैसर्गिकरित्या पुर्णपणे सडपातळ झाली. विशेष म्हणजे तिन व्यायाम केला नाही. व डायट ही केल नाही. मला वैयक्तीक संमोहन उपचार व त्या मानसीक व शारीरीक क्रियाप्रक्रियावर एवढा विश्वास होता की, मी तिला म्हणायचो, तु तीन टाइम जेवण कर, तरीही तुझं वजन कमी होणारं आणि झालं सुध्दा. लग्ना अगोदर पत्नी जाड असताना होकार देणं, आणि तिला सडपातळ करण्याचं चॅलेंज घेणं, ही सोपी गोष्ट नाही. हा माझा स्वतःचा वैयक्तीक अनुभव आहे. परंतु संमोहन उपचारासोबत व्यायाम व डायट केल्यास खुप चांगले रिझल्ट मिळतात. मी सुध्दा रोज व्यायाम करतो. अयोग्य पदार्थ खाणे टाळतो. व्यायाम न केल्यामुळे, अयोग्य पदार्थ खाल्यामुळे शरीरावर ताण निर्माण होत राहतो. पुढे त्याचे परीणाम हे भोगावेच लागतात. त्यामुळे व्यायाम व योग्य आहार हे निरोगी जीवनाचं गुणसूत्र आहे.
* लठठपणा मानसीक ताणः-
मानसीक ताणांचा थेट संबंध अंतःस्रावी ग्रंथीशी येतो. संप्रेरक ग्रंथीच्या काही दुखण्यांमध्ये या ग्रंथींमधून खूप अधिक प्रमाणात संप्रेरक रक्तप्रवाहात सोडले जातात. अधिक प्रमाणातील या संप्रेरकांनी मेंदूतील खाण्याच्या आणि खाल्यानंतर वाटणायी समाधानाच्या केंद्राचं कार्य बिघडतं. खाल्यानंतर वाटणाऱ्या समाधानाचं केंद्र खाण्याच्या केंद्राचं नियंत्रण करतं असते. माणसाला खाणं थांबवण्याची इच्छा होते. माणसाच्या मनावर येणारा भावनीक ताण, यामुळे या केंद्राची कार्य बिघडू लागतात. काही माणसं भावनीक ताणाच्या अवस्थेत खूप अधिक खाण्याची सवय जडते. संमोहनाव्दारे अंतर्मनाच्या माध्यमातून मेंदूतल्या भुकेशी संबंधित या केंद्रापर्यंत वजन कमी होणं संबंधित सूचना पाठविता येतात व वनज कमी करता येतं.
लठ्ठपणा बाबत महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक सूचनेमुळे शरीर खचू शकत, खराब होऊ शकतो, वाळून जाऊ शकतं. तर सकारात्मक सूचनेमुळे शरीर सदुडू बनू शकतं, मजबूत बनवू शकतं, बळकट बनू शकतं, व्यक्तीच्या लठ्ठपणा कायमचा नष्ट करण्यासाठी योग्य सूचना त्याच्या अंतर्मनात जाणं गरजेचं आहे. योग्य सूचना अंतर्मनात गेल्यास व्यक्तीचं शरीर सडपातळ बनतं. स्लिम बनतं, असा आमच्याकडील अनेक व्यक्तींचा अनुभव आहे.
लक्षात ठेवा, तुमच्या लठ्ठपणाचा तुमच्या जीवनावर, तुमच्या आरोग्यावर, तुमच्या व्यक्तीमत्वावर, तुमच्या करीअरवर, तुमच्या नातेसंबंधावर, तुमच्या मुलांच्या सोबत खेळण्याच्या क्षमतेवर, तुमच्या जोडीदाराच्या विचार सरणीवर खुप मोठा विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे लठ्ठपणावर मात करणं, चालू जीवनासाठी ही आणि भविष्यकालीन जीवनासाठीही गरजच आहे.