रोड अल्फासिस, अपघात व संमोहन

रिपोर्ट नुसार २०२१ साली ४ लाख, १२ हजार, ४३२ अपघात झाले. यामध्ये १ लाख, ५३ हजार, ९७२ लोकांना प्राणास मुकावे लागले. तर ३ लाख, ८४ हजार, ४४८ लोक गंभीर जखमी झाले. अपंग झाले. प्रत्येक वषी असे लाखो लोक अपघातात मृत्यूमुखी पडतात. जखमी होतात. रोडवर होणाऱ्या अपघातामध्ये ‘रोड अल्फासिस’ हा प्रकार प्रामुख्याने आढळतो. अल्फा ही एक मनाची गुंगीची अवस्था आहे. हायवेवर झोप खुप लांबचा प्रवास असल्यास,

सारखं एकाच स्थितीत बसल्याने, तोच तोच पणा आल्याने, चेतन मन निष्क्रीयतेकडं जाऊ लागतं, माणसाला गुंगी लागते. डुलकी लागते. अशाच अवस्थेत बाहन डिव्हायडर वर जाणं, रस्ता सोडून जाणं, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या गाडीला जाऊन धडकणं, एखाद्या गाडीला सरळ जाऊन धडकणं इ. असे बरेच प्रकार या गुंगीच्या / डुलकीच्या अवस्थेत घडतात. मग ते वाहन संथगतीने असो अथवा वेगवान असो. गुंगी ही मनाची अल्फा अवस्था आहे. म्हणून यास ‘रोड अल्फासिस’ असं संबोधलं जातं. पुर्वी यास रोड हिप्नोसिस असंही संबोधले जायचे. परंतु त्यास शास्त्रीय आधार नाही. कारण हिप्नोसिस हे, ‘एका व्यक्तीकडून, जाणीवपूर्वक दुसर्या व्यक्तीवर त्याच्या इच्छेनुसार केलं जातं असत’. परंतु रोड अपघातात असा कोणताच प्रकार घडत नाही. रोड अपघातातील गुंगी ही नैसर्गिक असते. आणि व्यक्तीला नैसर्गिक येणारी गुंगी ही मनाच्या अल्फा स्टेज मध्ये गणली जाते. त्यामुळे आज २१ व्या युगात रोडवरील गुंगीला ‘रोड अल्फासिस’ म्हणणं अधिक शास्त्रीय ठरेल. आज या रोड अल्फासिस (रोड-गुंगी) ला नियंत्रित करण्यासाठी संमोहन उपयोगी ठरत आहे. संमोहन अवस्थेत चालकाचे (ड्रायव्हर) माईड रिप्रोग्रॅमिंग केल्यास, रोड अल्फासिस पासून त्याचा बचाव होऊ शकतो. संमोहनावस्थेत जर चालकाच्या अंतर्मनात, ‘यापुढे तुला वाहन चालवताना कधीही झोप लागणार नाही’.

कोणत्याही परिस्थितीत झोप लागणार नाही. तु कितीही तास सलग बाहन चालवलं तरी तुला कसलीही झोप लागणार नाही. अशा सुचना पाठवल्या तर नंतर चालकाला वाहन चालवताना कधीही झोप लागत नाही. ‘यापुढे गाडीच्या सीटवर कधीही झोप लागणार नाही’ अशी सुचना दिली तर गाडी चालवत नसताना सुद्धा, तासनतास फक्त गाडीच्या सीटवर बसला तरी त्याला झोप लागणार नाही. रात्रभर तो जागेल पण त्याला गाडीच्या सीटवर झोप लागणार नाही. मला पुरणपोळी पचत नाही. अशी ज्याची धारणा असते. घरात तीच पोळी त्याच्या पत्नीला पचेल पण त्याला पचणार नाही. अगदी तसंच, त्या गाडीच्या सीटवर दुसऱ्या कोणासही झोप लागेल, परंतु त्या चालकाला झोप लागणार नाही. कारण संमोहनाच्या साहाय्याने त्या चालकाची धारणाच तशी बनवली गेली आहे.

आज मोठमोठे उद्योजक स्वतः व वाहन चालक ‘रोड अल्फासिस’ ला बळी पडू नयेत यासाठी माझ्या संमोहन उपचाराचा लाभ घेत आहेत. एस. टी. बस वाहन चालकांसाठी विविध ठिकाणी माझ्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. मालवाहतूक कंपनी, मालक त्यांचे वाहन चालक रोड अल्फासिस ला बळी पडून संपत्तीचे नुकसान होऊ नये, जीविताला धोका होऊ यासाठी वेळोवेळी माझ्या संमोहन उपचार कार्यशाळा आयोजित करतात. मित्र हो, रोड अल्फासिस (रोड-गुंगी) तुमच्या जीवावर बेतू शकते. तिचा संमोहनाद्वारे तुम्ही कायमचा बंदोबस्त करु शकता.

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×