मन-शरीर आजार व कारणं

एखादा व्यक्ती प्राणघातक आजारातूनही कसा बाहेर येतो? तर एखादा क्षुलुक आजार सुध्दा प्राणघातक कसा ठरतो? याचं उत्तर अनेकदिवस आरोग्य विभागास देता आलं नाही. परंतु बरं होणाऱ्याच्या मनात जगण्याची तीव्र इच्छा असते. तर क्षुल्लक व्याधी प्राणघातक ठरणाऱ्या रुग्णांला जीवन नकोसं झालेल्याची भावना मनात असते. मानव आणि त्याच्या भावना या समजून घेतल्यानंतरच आपण का व कशामुळे आजारी पडतो या रहस्याचा उलघडा होईल.

उच्च रक्तदाब

अशा व्यक्ती त्यांच्या बालपणी प्रमाणाबाहेर चांगले असतात. त्यांच्या गुप्त गोष्टी ते स्वतःजवळच ठेवतात. भावना मोकळेपणाने व्यक्त करीत नाहीत. या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने भयग्रस्त असतात.

हृदयविकारः

या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया असते. कोणत्याही निर्णयात संघर्षात्मक व्दिधा मनस्थिती असतें. यांना कधीही हिंसक वळण येते. या सभ्य, लाजाळू, बिचारी असल्याचं आढळून आलं आहे.

अपघात

काही वेळेस जबाबदारीतून सुटका करून घेण्याच्या भावनेनेही अपघात घडतो. एखादी व्याधी जडते. अशा व्यक्तींना अपघाताच्या दुःखापेक्षा जबाबदारीतून सुटका झाल्याचं समाधान अधिक असतं. वास्तवाला जाणीवपूर्वक तोंड देण्याचे टाळण्याकरता मानव अजाणता अनेक मार्ग शोधीत असतो. ज्यावेळी प्रबळ, अबोध, आवेगांना, कृती, संवाद किंवा विचार याव्दारे सरळ मार्ग सापडत नसतो. त्यावेळी ते आवेग अपघात व आजारांचा आधार घेतात.

असुरक्षितता

पैशाचा तुटवडा असणाऱ्या व प्रचंड पैसा संचय असलेल्या व्यक्ती स्वतःस अधिक असुरक्षित महसूस करतात.

दमा:

दम्यान पछाडलेल्या व्यक्तीमध्ये अपुरेपणाची सर्वसामान्य भावना प्रबल असते. दम्याचे स्वण दुःखी असतात. ते रडत नाहीत. त्यांच्यापैकी काहीनी तर गेल्या अनेक वर्षांत एकही अश्रू ढाळलेला नसतो. दमेकरी स्वणांना सुरक्षितता आणि आधार यांची गरज मोठयापमाणात असते. परंतु ते तसं दाखवत नाहीत. हा व्यक्ती अनेकवर्ष तणाव, एकाकी यांच्या ओझ्याखाली दडपलेला असतो. असे लोक दुःख मनामध्ये दाबून ठेवतात. दम्यामध्ये श्वास घेताना किंवा सोडताना त्रास होणे, त्याचबरोबर भय वाटणे, घामाघूम होणे, नाडी जलद होणे, थरथर कापणे, रक्तदाब वाढणे इ. लक्षणे दिसून येतात. बऱ्याचवेळा जन्म झाल्यावर गर्भशयातून बाहेर आल्याआल्या गर्भातील द्रव्य नाकातोडांत काही सेकंद राहून श्वाच्छोवास घेण्यास बालकास कठीण जातं. त्याला गुदमरते, ते बाळ भयभीत होते, खोकते, अस्वस्थ होते, नंतर डॉक्टरने उलटे करून पायावर मारल्यानंतर नाक मोकळे झाल्यावर दीर्घ वास घेतो. परंतु हा अनुभव मुलाच्या भावनेत त्यांतरीत होतो. त्यास पुढे बालदमा होतो.

जीवनः

जीवन हे महासागराप्रमाणे अथांग असते, निरोगी आणि सुखी जीवन वृध्दावस्येची कोणतीही लक्षण न दाखविता, व्याधो किंवा वेदनेने आजारी न पडता जगणं, हे अखेर तुमच्याच हातात असतं. त्यासाठी आंतरीक अमयीद शक्ती तुम्हाला मदत करूशकते.

रिझल्ट व परीणामः

काही रुग्ण असे असतात की, त्यांना जगण्याची तीव्र इच्छा असते. असे रुग्ण लवकर बरे होतात. परंतु काही रुग्णांना जीवन नकोसे झालेले असते. अशा रुग्णांना बरे करणं अशक्य असते. जगण्याची तीव्र इच्छा ही औषधापेक्षाही परीणामकारक अमृत आहे.

सांधेदुखीः

सांधेदुखीने त्रस्त व्यक्ती ही मनामध्ये वैरभाव (व्देष, राग, मत्सर) बाळगणारी, संतापयुक्त आणि आक्रमक वृतीची असू शकते, अशा व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे नेहमी ताठर व न बाकणारे असते.

– कुण्यातरी व्यक्तीविषयी वाटणारा तिरस्कार हा ही सांधेदुखीत कारणीभूत ठरतो. दडपून टाकलेला क्रोध, मारण्याची, धुडकावण्याची इच्छा, वैरभाव असतात. परंतु परीस्थिती अनुकूल नसल्याने मजबूरीने त्या भावना दडपल्या जातात.

क्रोधामुळे पेशींमधील अतिरीक्त उर्जेचा वापर होउन कालांतराने त्या कमजोर बनत जातात. त्यामुळे ताठर व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तीस उतारत्या वयात सांधेदुखी व स्नायुदुखी आढळून येते. टेंशन आल्यावर पेशीसंस्थावर ताण येतो. घाबरल्यामुळे शरीरातील पेशींसंस्था कमजोर होतात. चिंता व काळजी मुळे निराश होउन कमजोरी बाढते. तुमच्या शरीरात पेशीसंस्थामध्ये येणाऱ्या दुर्बलतेमुळे / कमजोरीमुळेच तुमच्या शरीरातील कोणताही आजार उदभवतो. तुमच्या शरीरातील पेशीसंस्था सक्षम राहिल्या तर तुमच्या शरीरात आजार उदभवणे शक्यच नाही.

मान बाकडी होणे:

यामध्ये काहीतरी अक्षम्य घटना असते. अपराधाची व आत्मशासन ही भावना यात प्रबळ असते. किंवा काहीवेळेस स्वतःला लाज वाटावी असे काहीतरी घडणे, स्वतःच्याच नजरेत उतरणे इ.

डोकेदुखीः

अर्धशिशीने बेजार झालेल्या व्यक्ती बाहयतः शांत, समतोल, वृत्तीची, अनाक्रमक आणि नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असतात. पुरुषापेक्षा स्त्रियांना अर्धशीशीचा त्रास जास्त असतो. त्यामुळे त्या क्रोध, वैर, वैफल्य आणि विग्रह या भावनांनी आतल्याआत घुमसत असतात. वरील भावना दाबून राहिल्यामुळे एकवेळेस त्या प्रतिकूल भावना उफाळून आजाराचे रूप धारण करून वर येतात. घरातील एखादया व्यक्तीला टापटीपपणा व स्वच्छतेचं खुप वेड असतं. आणि घरातील इतर व्यक्तीनी जर तसा टापटीषपणा व स्वच्छता न ठेवल्यास ती व्यक्ती अस्वस्थ होते. जागच्या जागी ठेवलेल्या वस्तू विस्कटून टाकणाऱ्या व्यक्तीविषयी (विशेषतः पती) निर्माण झालेल्या वैफल्याच्या आणि क्रोधाच्या भावना सुध्दा डोकेदुखीत भर घालतात. मुलाला सारखं शिक्षा केल्यामुळे किंवा सारखं धाकात ठेवल्यामुळे तसच क्रोध आणि वैर या दुष्ट भावना आहेत. त्या दाबूनच टाकल्या पाहिजेत. ही धारणा त्याच्या मनात रुजवल्यामुळे याचा उद्रेक मोठेपणी होतो आणि डोकेदुखीस प्रारंभ होतो.

अर्धशिशीने त्रस्त झालेली व्यक्ती ही पुष्कळदा विकृतमज्ज आणि आत्यंतिक संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे. एखादा तुच्छतापूर्वक मारलेला शेरा आपल्यालाच मारला गेला आहे, असं त्यांना वाटतं. प्रत्यक्षात दुसऱ्या व्यक्तीचा तसा कोणताही उददेश नसतो. अनेक बाबतीत गरज नसताना स्वतःला दोष देणं आणि अपराधीत्वाची भावना बाळगणे इ. स्वभावगुण आढळतात. मुलगा न होता मुलगी झाली म्हणून पश्चाताप करणारी माता किंवा पिता यामुळेही डोकेदुखीला सुरुवात होउ शकते. ही व्यक्ती म्हणजे, ‘माझी डोकेदुखीच आहे’ अशी बाक्य प्रत्यक्षात तुमच्या डोकेदुखीला कारणीभुत ठरत असतात. ‘मी तिला मिळू शकत नाही’, ‘मी त्याला पोटात घेउ शकत नाही’ अशी बाक्य तिरस्कार निर्माण करतात. आणि हीच वाक्य व्यक्तीच्या अपचनाला देखील कारणीभुत ठरतात. ‘मला जीवनाचा कंटाळा आला आहे, जगण्याची इच्छा राहिली नाही, माझे हृदय कमजोर आहे, मी कमजोर झालो आहे, मी आजारांनी घेरून गेलो आहे, मला वाटत नाही, मी बरा होईन, जबाबदारीचं ओझं मला सहन होत नाही’, अशी वाक्य व्यक्तीला कमजोर बनवून, जीवन अंताकडे सुध्दा नेत असतात. सुखी व आनंदी बिनधास्त लोकांपेक्षा दुःखी व तणावग्रस्त व्यक्तीच आजारांना अधिक बळी पडत असतात.

एखादया स्त्रीचा नवरा कर्तव्यनिष्ठ नसेल, बिनकामी असेल तर अशा स्त्रीला संसाराची, मुलाबाळांची भविष्याची चिंता लागते. क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारीने ती जास्तच चिंतेत अडकत जाते. आणि विविध शारीरीक व मानसीक समस्यांना बळी पडते. चिंता ही चिता समान असते. त्यामुळे आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करण्याचा निर्धार केल्यास चिंता मनाला स्पर्शही करू शकत नाही.

पाळीच्या तक्रारीः

ज्याप्रमाणे शरीर स्वच्छतेसाठी मलमुत्रताचं विसर्जन हे शरीर शुध्दतेचं काम करतं. त्याच पध्दतीने स्त्रीसाठी पाळी येण, ही सुध्दा एक शरीर शुध्दतेचंच कार्य आहे. परंतु याच पाळीकडे नकारात्मकतेने पाहिलं जातं. तिरस्काराने पाहिलं जातं. पाळीच्या तक्रारी व गर्भशयाच्या समस्या हया त्याच तिरस्काराचे प्रतिरूप आहेत. आज प्रत्येक स्त्रीला जो पाळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यास त्यांच्या धर्मात स्त्रीच्या पाळीकडे पाहण्याचा अपवित्र दृष्टीकोन कारणीभूत आहे. पाळी येण्याच्या प्रक्रियेचे मनापासून धन्यवादाची, प्रेमाची भावना बाळगण गरजेच आहे.

लैंगिक समस्या

लैंगिक समस्येमध्ये भय, चुकीची धारणा व अपराधीपणाची भावना अधिक प्रबळ असते. लहानपणापासून मुलास किंवा मुलीस भिन्नलिंगीपासून दूर राहण्यास सागतात. मनावर बिबवतात, त्यामुळे पुढे स्त्रिया मंदकाम बनतात. आकडेवारीनुसार असे दिसते की, तीन स्त्रीपैकी एक स्त्री थोडी किवा संपुर्ण मंदकाम आहे. कामवासना उत्तेजीत होण्यासाठी स्त्री वेळ लागतो. स्त्रीची कामवासना उत्तेजीत करणे एक कला आहे. अनेक पुरुषांना ती जमत नाही. जर ती जमली तर मंदकाम स्त्रीसुध्दा पतीला चांगला प्रतिसाद देउ शकते. स्त्रीच्या मनात तिरस्कार, चीड व भय इ. भावना निर्माण झाल्यावरही संभोगसुखात अडचणी येतात. तसेच आपण जसजसे प्रौढ होउ तसतसे आपण कमी आकर्षक दिसू व त्याच सोबत कामवासनाही कमी होत जाईल, अशी भावनासुध्दा मंदकामतेस साहायक ठरते. ‘वयाच्या ८० व्या वर्षी सुध्दा समागम करणारे वृध्द लोक मी पाहिले आहेत’. प्रा. मधुकर दिघे.

सततच्या सानिध्यामुळे आणि जोडीदाराची सवय (एक वस्तुपणा) झाल्यामुळे कामवासना कमी प्रमाणात उददीपीत होत जाते परंतु पत्नी सोडून इतर स्त्रीच्या बाबतीत पुरुवाची कामवासना अधिक उत्तेजीत होते. त्यामुळे पतीपत्नी यांनी जास्त सानिध्यामध्ये राहू नये. नवीन लग्न झाल्या झाल्या अनेक दिवस २४ तास सोबत राहिल्यामुळे जोडीदारातील रस संपून जातो. कमी होतो. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही संबंधात लैंगिक बाबतीत आढळून येणारा भावात्म समतोल हा अत्यंत नाजूक असतो. काहीवेळेस थकवा, चिंता, किंवा काही धुलुक भावात्म विक्षोभ अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. परंतु असे अडथळे हे तात्पुरत्या स्वख्यातील असतात. परंतु बऱ्याचवेळा काही पुरुष अशावेळी घाबरतात व नकारात्मक होतात. परंतु वरील अपयशाचे कारण न समजल्यामुळे भयग्रस्तता आणि तीव्रभय यामुळे सुध्दा कामवासना कमी होत जाते. कामवासना उत्तेजीत करण्याची प्रक्रिया जेवढी अधिक असेल तेवढी ताठरता व कामसुख अधिककाळ अनुभवता येतं.

भावनात्मक प्रभोभ आणि आजारः

आज वैदयकीय क्षेत्र सुध्दा मानते की, आपल्या शरीरातील ८० टक्के शारीरीक आजार हे मनोशारीरीक आहेत. मानसीक ताण निर्माण करणाऱ्या मनातील विविध प्रतिकूल भावना व नकारात्मक धारणा या बाबी या शारीरीक आजारांच्या मुळाशी असतात. दीर्घकाळ अशा प्रतिकूल भावना मनात राहिल्या त्या त्या संदर्भात विविध आजार निर्माण होण्याचा संभव निर्माण होतो. त्यातील आजारांचा संदर्भ संबंध आडावा…. बेदनाः प्रेमाची भूक, कुशीत घ्यावं अशी इच्छा अपराधाची भावना, शिक्षा व्हावी अशी इच्छा

व्यसनंः स्वतःपासून दूर पळण्याचा प्रयत्न, मिती, स्वतःवर प्रेम कसं करावं हे माहित नसणं.

रक्तक्षयः आनंदाचा अभाव, जीवनाची भिती निरुत्साह

गळू, गळबः मानहानी मनात घोळवत बसणे, सतत सुडाचे विचार

मुळव्याधः क्रोध आणि निष्फळता

भंगदर : भुतकाळातील त्रासदायक आठवणीचा संग्रह

गुदव्दाराची खाजः अपराधीपणाची जाणीव, पश्चाताप

गुदव्दारात बेदनाः भुतकाळातील अपराध, शिक्षा करून घ्यावीशी वाटणं

जास्त भूक लागणेः सरंक्षणाची गरज, कमजोरीची मिती

प्राण्यांचा देशः संताप आतमध्ये कोंडून घेणे, स्वतःला शिक्षा करून घ्यावीशी वाटणे

हिरडयातून रक्त येणेः जीवनात मनाविरुध्द घेतलेल निर्णय

रक्तदाब कमीः लहानपणी प्रेमाचा अभाव, हरल्याची भावना काय उपयोग आहे या सगळ्यांचा अंगाला दुर्गधी येणे स्वतः विषयी घृणा दुसऱ्यांबददल मिती, संतापाने खदखदणे, हाडांचे दोषः ताणतणावर व लवचिकता नसणे

भूक कमीः भिती, स्वतःची काळजी नसणे, जीवनावर विश्वास नसणे. बोटांचा सांधिवातः स्वतःला शिक्षा करून घेण्याची इच्छा, आपण बळी ठरल्याची भावना सांधेबातः कोणी प्रेम करत नाही असं वाटणं, आत्मपिडा, चीड दमा प्रेमाचा कोंडमारा, मुकपणे सहन

करणे

तोंडाला दुर्गधी येणेः राग, सुडाचे विचार, कडवट अनुभव टकलः ताणतणाव, भिती, सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न,

मनातील भावक गुंता न सोडणे

पचनामधील अडथळाः जुने विचार, जुन्या धारणा धरून ठेवण्याची प्रवृत्ती मेंदूचा ट्युमरः चुकीच्या समजुतीचा संग्रह, जुन्या विचारांना चिटकून राहणं, हटटीपणा, नवीन विचारांना थारा न देणं

श्वसनरोग : जीवनाचा सहजपणे उपभोग घेण्याची मिती, स्वतःच्या अस्तित्वाविषयी शंका कॅन्सरः खोलवर दुखावले जाणं, दीर्घकाळ व्देष, रहस्य दडवून ठेवणं, दुःखाने मन पोखरून जाणं, काव उपयोग आहे सगळयाचा? अशी धारणा असण

मनगटाचा सांधा दुखणं: चीड, राग, सतत अन्याय झाल्याची भावना

मोतीबिंदूः आनंदाने बघण्याची क्षमता नसणं, भविष्य असुरक्षित अंधारमय वाटणं कोलेस्टेरॉलः आनंदाचा अनुभव घेण्याची भिती आनंदाचा अभाव

बहिरेपणाः नकार देणे, हट्टीपणा, एकलकोंडेपणा, मला कोणाचं ऐकायच नाही, मला त्रास होतो

Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×