संमोहन अवस्था म्हणजे काय?

संमोहन अवस्थेत व्यक्तीचा श्वास शांत लयबद्ध रितीने प्रवास करु लागतो. ज्यामुळे व्यक्तीचं मन व शरीर नैसर्गिकपणे हिलींग होण्यास सुरुवात होते. या अवस्थेत मनाची एकाग्रता उच्चतम अवस्थेला पोहचते. व्यक्तीच्या मनाची ग्रहण क्षमता प्रचंड वाढते. आणि याचाच सदुपयोग संमोहन उपचारामध्ये केला जातो. मानवासाठी वरदान ठरणाऱ्या संमोहन अवस्थेविषयी आपण जाणून घेतलच पाहिजे.

आपल्या माईंड(मन) एकूण पाच स्टेज मधून रोज प्रवास करीत असतं. १) गामा २) बीटा ३) अल्फा ४) थीटा व ५) डेल्टा.

१) गामा :
आपण जेव्हा टेन्शन, हायपर, वादविवाद इ. वाताहत परिस्थितीत असेल तेव्हा आपल्या माईंडची ब्रेन व्हेव फ्रीक्वेंसी ३२-१०० हर्ट्झ राहून आपलं माईंड गामा स्टेजला पोहचते.
२) बीटा :
आपण जेव्हा नॉर्मल अवस्थेत अवस्थेत असतो. अर्थात आपलं बोलणं-चालणं, काम करणं इ. सामान्य परिस्थितीमध्ये आपलं माईंड बीटा स्टेजला असतं. तेव्हा माईंडची ब्रेन व्हेव फ्रीक्वेंसी १४-३२ हर्ट्झ असते.
३) अल्फा:
या अवस्थेत व्यक्ती पुर्ण झोपलेला ही नसतो आणि पुर्ण जागाही नसतो. या अवस्थेत व्यक्ती गुंगीच्या अवस्थेत असतो. रोज रात्री झोपताना आपण सर्वजण या गुंगीच्या अवस्थेत जाऊन पुढे झोपी जातो. परंतु या अवस्थेवर व्यक्तीच कधीही नियंत्रण नसतं. गुंगी आली म्हणता-म्हणता झोप कधी लागते, हेच व्यक्तीला कळत नाही. या अवस्थेत माईंडची ब्रेन व्हेव फ्रीक्वेंसी ७-१३ हर्ट्झ राहते.
४) थीटा:
या अवस्थेत व्यक्ती पुर्ण झोपलेला असतो. या अवस्थेत माईंडची ब्रेन व्हेव फ्रीक्वेंसी ४-७ हर्ट्झ असते.
५) डेल्टा :
या अवस्थेत व्यक्ती गाढ झोपलेला असतो. जर व्यक्ती ६-७ झोपला त्यातील २-३ तीन तास तो गाढ झोपेत असतो. यावेळी माईंची डेल्टा स्टेजला राहते. या अवस्थेत माईंडची ब्रेन व्हेव फ्रीक्वेंसी ०.२५-४ हर्ट्झ असते.

संमोहन अवस्थेला मनाची अर्धजागृत अवस्था म्हटले जाते. तर वैज्ञानिक भाषेत रिलॅक्सेशनची नेक्स्ट स्टेप(पुढची अवस्था) म्हटले जाते.
डीप शवासन-रिलॅक्सेशन-मेडीटेशन, ध्यानावस्था, मनाची शून्य अर्थात समाधी अवस्था इ. सर्व मनाच्या अवस्था या मनाच्या अर्धजागृत अवस्था म्हणून ओळखल्या जातात. या सर्व अवस्था ह्या माईंडच्या “अल्फा स्टेज” ला असतात. परंतु आपण जे रोज मेडीटेशन करतो, ते तेवढे डीप नसते. अर्थातच संमोहन अवस्था सुद्धा माईंडच्या ‘अल्फा स्टेज’ लाच कार्य करते. मनाची ही अवस्था मिळवण्यासाठी साधू-सन्याशी सर्व संसार सोडून जातात. अनेक महिने-वर्ष तपश्चर्या करतात. तेव्हा ते मनाच्या अर्धजागृत अवस्थेला प्राप्त करतात. संसारी व्यक्तीला ही मनाची अर्धजागृत अवस्था मिळवण कधीच शक्य नाही. परंतु संमोहनाच्या कृपेने संसारी व्यक्ती सुद्धा मनाच्या अर्धजागृत अवस्थेची अनुभुती घेऊ लागला आहे.
माईंडच्या अल्फा स्टेज मध्ये तीन स्टेज पडतात. सामान्य(light) अल्फा, मध्यम(medium) अल्फा, गाढ(deep) अल्फा. या तीन्ही अवस्थेचा संमोहन उपचारामध्ये मुख्यतः उपयोग केला जातो.

आपलं माईंड रोज संमोहन अवस्थेच्या पुढच्या दोन स्टेजला जाऊन पुन्हा माघारी येते. अर्थात आपण झोपी जाताना बीटा स्टेजला असतो‌. नंतर गुंगी लागून अल्फा स्टेजला(संमोहन अवस्था) जातो. नंतर झोप लागून आपलं माईंड थीटा स्टेजला जातं. नंतर गाढ झोपी जाऊन माईंड डेल्टा स्टेजला जातं. आणि सकाळी उठताना माईंड डेल्टा वरुन, थीटा ला येतं. थीटा वरुन अल्फा ला येतं. अल्फा वरुन बीटा येऊन व्यक्ती जागा होतो. अर्थात आपलं माईंड रोज या सर्व अवस्थेतून प्रवास करीत असतं. संमोहन अवस्थेच्या पलीकडे जात असतं. त्यामुळे संमोहन अवस्था ही एक मनाची नैसर्गिक अवस्था आहे. जी आज मानवासाठी वरदान ठरत आहे.


Call Now
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×