संमोहन उपचार म्हणजे काय?
आपली दोन मनं असतात. एक असतं, बाह्यमन ज्यास आपली बुद्धी म्हणू शकतो. जे तर्क-वितर्क करते. तर दुसरं असतं, अंतर्मन. ज्यामध्ये व्यक्तीचं व्यक्तीमत्व अर्थात स्वभाव, सवयी, वर्तन, विचारांची दिशा, तसेच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचे सॉफ्टवेअर अर्थात त्याच्या धारणा, बिलीफ, इमोशन, दृष्टिकोन इ. बाबी सामावलेल्या असतात. एवढेच नव्हे तर व्यक्तीच्या शरीरातील नर्व्हस सिस्टिम ची कार्यप्रणाली ज्या विश्वासप्रणालीवर कार्य करते. ती धारणात्मक विश्वासप्रणाली सुद्धा याच अंतर्मनात सामावलेली असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतः च्या आरोग्याविषयी असणाऱ्या धारणा, बिलीफ याच त्याच्या शारीरिक कार्यप्रणाली व आरोग्या त महत्वाची भूमिका बजावत असतात. सोबतच त्याच्या यश व जीवन याबाबत असणाऱ्या ‘धारणा’ याच बाबी त्याच्या जीवनावर परिणाम करीत असतात. व्यक्तीच्या मानसिक आजारांची, शारीरिक व लैंगिक आजारांची, अनिष्ट सवयींची, नकारात्मकतेची मुळ कारणं ही व्यक्तीच्या अंतर्मनात असतात. व्यक्तीची प्रचंड बुद्धिमत्ता, अमर्याद क्षमता, परम आनंद व शांती हे ही व्यक्तीच्या अंतर्मनातच असतात. स्कूल, यश, आरोग्य, आनंद, जीवन, संसार याबाबतच्या व्यक्तीच्या नकारात्मक धारणा, कमकुवत विश्वास प्रणाली हीच त्याच्या जीवनातील अपयश, दुःख, यातना, बेचैनी, पश्चात्ताप, विविध आजार यास कारणीभूत असतात.
एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती आत्मविश्वास, धाडस, मनोधैर्य, आनंद, उत्साह, प्रसन्नता, स्थिरता, सकारात्मकता, निर्भीडता, दूरदृष्टी, अचूक निर्णय क्षमता, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा इ. गुण सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात वसलेले असतात. परंतु व्यक्तीच्या नकारात्मक धारणांमुळे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात प्रतिकूल भावना अर्थात भिती, काळजी, चिंता, टेंशन, दडपण, धडधड, निराशा, उदासिनता, निगेटिव्ह विचार, आत्मविश्वास व एकाग्रतेची कमतरता, एकलकोंडेपणा, न्यूनगंड इ. समस्या निर्माण होतात. विविध शारीरिक व लैंगिक आजार निर्माण होतात.
अशा परिस्थितीत व्यक्तीला त्याच्या विविध जुनाट आजारांवर मात करायचं असो अथवा आपल्या क्षमता वाढवायच्या असो, व्यक्तीला अंतर्मनाच्या सहकार्याची गरज भासते. आणि अंतर्मनात बदल, सुधारणा व परीवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला गरज पडते, संमोहन उपचाराची (हिप्नोथेरपी).
संमोहन उपचाराद्वारे तुमची मानसिक कार्यप्रणाली, तुमची शारीरिक कार्यप्रणाली यामध्ये अपेक्षित बदल, सुधारणा व परीवर्तन संमोहनाद्वारे शक्य होते. तसेच तुमच्या बौद्धिक क्षमता, मानसिक व शारीरिक बळ वाढवण्यास मोठी मदत होते. आज स्पर्धेच्या युगात याची प्रचंड गरज निर्माण झाली आहे. जीवनातील असुरक्षितता, जबाबदाऱ्यांमुळे वाढणारा ताण व आधुनिक युगातील धावपळ त्यामुळे वाढणारा ताण तुमच्या मानसिक व शारीरिक क्षमता क्षीण करीत आहे. अशा परिस्थितीत मन व शरीर यास अपेक्षित रिलॅक्सेशन व सकारात्मक-मजबूत धारणात्मक रिप्रोग्रॅमिंग तुमच्या जीवनात अमुलाग्र परीवर्तन घडवून आणणार आहे, या संधीचा प्रत्येक जण लाभ जीवन यशस्वी, निरोगी व आनंदी बनवू शकतो. त्यासाठी तुमचं अंतर्मन च तुम्हाला सहकार्य करु शकत. आणि तुमच्या अंतर्मनात नवं-प्रेरणा एकमेव संमोहन उपचार निर्माण करु शकत. तेच तुमच्या भाग्योदयाचा सर्वोत्तम मार्ग ठरेल.
.