आध्यात्मिक संमोहन व जीवनातील समस्या
यास्तव स्पष्ट:
संमोहन उपचारास कायदेशीर, वैज्ञानिक व वैद्यकीय मान्यता आहे. परंतु आध्यात्मिक संमोहनास वैज्ञानिक मान्यता नाही. त्यामुळे आध्यात्मिक संमोहन मानणे अथवा न मानणे, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आध्यात्मिक संमोहनातील सर्व बाबी सत्य आहेत? असा कोणताही दावा या ठिकाणी केला जात नाही, हे स्पष्ट असावे. परंतु मनाची आध्यात्मिक बाजू नकारणं, हे मानवजातीसाठी अकल्याणकारकच ठरेल. अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास ठेऊन नाही तर आधात्मा मध्ये सुद्धा संशोधनात्मक वृत्ती ठेऊन आध्यात्मिक बाबींचा विकास मानवजातीसाठी अत्यावश्यक आहे.
परंतु व्यक्तीच्या जीवनात अशा विविध समस्या, प्रश्न असतात. ज्यांचं उत्तर विज्ञानाकडे मिळत नाही. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे व क्लिष्ट समस्यांचं निराकरण आध्यात्मिक संमोहनातून झाल्याचा शेकडो लोकांचा स्वानुभव आहे.
तुम्ही फक्त कोणत्याही व्यक्तीच नाव, गाव व फोटो पाठवला. तरी तुम्हाला संबंधित व्यक्तीबद्दल खालील माहिती मिळू शकते.
-ही व्यक्ती लग्नासाठी योग्य आहे का? प्रामाणिक आहे का? राहिल का? स्वभाव कसा आहे? दोघांचे स्वभाव जुळणारे आहेत का? एकमेकांच जमेल का? संबंधित व्यक्ती व्यसनी आहे का? खरं बोलतोय का? फसतोय का? .
-प्रयएवढे त्न करुनइही जीवनात यश का मिळत नाही? व्यवसायात किंवा जीवनात यश का येत नाही?
-बिझनेस/व्यवसायात कोणता व्यक्ती/पार्टनर कसा आहे? त्याचा स्वभाव कसा आहे? तो प्रामाणिक व विश्वास ठेवण्या योग्य आहे का?
-एखादा आजार भरपूर उपचार करुनही बरा का होत नाही? त्यावर योग्य उपचार कोणता ठरेल?
दैनंदिन जीवन, अंतर्मनाच्या संवेदना व आध्यात्मिक संमोहन :
आपणास जीवनात बऱ्याचदा अनेक गोष्टींची संवेदना(सेन्स) मिळत असते. आपण एखाद्याला म्हणतो, ‘तुला शंभर वर्ष आयुष्य आहे, मी आत्ताच तुझं नाव काढलं होतं/तुझी आठवण आली होती. अन् तु समोर आला किंवा तुझा फोन आला’. आईला स्वतः च्या बाळाविषयी बऱ्याच संवेदना मिळत असतात. तसेच आपण बऱ्याचदा म्हणतो, ‘मला वाटलच होतं, असं होईल!’, ‘मला वाटलच होतं, तो तसा करेल!’, ‘मला वाटलच होतं, ती दगा देईल’, ‘मी म्हटलंच होतं, तो विश्वास ठेवण्या लायक नाही’, ‘काय माहित पण, हा व्यक्ती मला योग्य वाटत नाही’ वगैरे-वगैरे. संवेदना आपल्या जीवनात अनेकांना होत असतात. बुद्ध असतील, विविध ऋषी-संन्याशी यांना विविध भविष्यकालीन घटनांचा बोध व्हायचा. याचे अनेक प्रमाण आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा आपली दोन मनं आहेत. एक वासनामन(बाह्य मन) तर दुसरं अंतर्मन. वासनामन अशांत व मलीन तर अंतर्मन पवित्र, शुद्ध व सामर्थ्यवान मानलं जातं. अंतर्मनाला व्यक्तीच्या भूत, वर्तमान व भविष्याचा बोध असतो, असं मानलं जातं. तोच बोध संवेदनेच्या रुपाने व्यक्तीला देण्याचा प्रयत्न अंतर्मन करीत असतं. परंतु महत्वाची बाब अशी की, अंतर्मनाची संवेदना व मानसिक कल्पना, संशय, भय इ. यामध्ये फरक आहे. या दोन्ही संवेदना मध्ये भेद करणं संसारी व्यक्तीला शक्य होत नाही. कारण आपल्याला अंतर्मनाची संवेदना स्पष्ट होण्यासाठी आपले विचार व मन शून्य होण्याची आवश्यकता असते. परंतु व्यक्तीच्या वासनामनात दिवसाला ६० हजारांपेक्षा जास्त विचार येतात. आणि विचार थांबवणे, शांत करणे, हे संसारी व्यक्तीच्या आवाक्या बाहेरील गोष्ट आहे. बुद्ध, संन्याशी, ऋषी ध्यानाच्या माध्यमातून मनाला शून्यतेत घेऊन जातात. त्यामुळे त्यांना अज्ञात गोष्टींचा सुद्धा बोध होऊ लागतो. अंतर्मनाच्या या शून्य अवस्थेत अनेक गोष्टी व्यक्तीला स्पष्टपणे दिसू लागतात. जाणवू लागतात. अंतर्मनाच्या संवेदना एकदम स्पष्ट होऊ लागतात. भूत, वर्तमान व भविष्य तिन्ही कालीन, चित्र व ध्वनी या दोन्हींची संवेदना स्पष्ट होऊ लागते. संमोहन अवस्थेमध्येही अशी एक अवस्था आहे. जी मनाला शून्य अवस्थेच्या अगदी जवळ घेऊन जाते. संमोहनाच्या तीन अवस्था या उपचारांसाठी वापरल्या जातात. परंतु संमोहनाची एक पाचवी अवस्था आहे, जिचं नाव आहे, ‘सोमनॅम बुलीझम अवस्था’. या अवस्थेत व्यक्तीच बाह्यमन पुर्णतः लुप्त होऊन, अंतर्मन पुर्णतः जागृत होते. मनुष्याचे सिक्स सेन्स जागृत होतात. या अवस्थेत व्यक्तीला अंतर्मनाच्या संवेदना स्पष्ट जाणवू लागतात. आमच्या अनुभवानुसार आजपर्यंत या अवस्थेत बऱ्याच बाबींचा परीक्षणासहीत अचुक अंदाज आला आहे. १०-२० टक्के कधी-कधी अंदाज चुकीचा ही ठरला आहे. परंतु जास्तीत जास्त ८० टक्क्यांपर्यंत संवेदना अचूक ठरल्या. ज्यांनी आजपर्यंत लोकांच जीवन बदलण्याचं काम केले आहे. तुम्ही ही तुमच्या जीवनातील विविध वर्षानुवर्षाचे क्लिष्ट प्रश्न व समस्यांच निराकरण करण्यासाठी आध्यात्मिक संमोहनाचा आधार घेऊ शकता.
संमोहनाची सोमनॅमबुलीझम अवस्था:-
संमोहनाची डीप रिलॅक्सेशनची पाचवी अवस्था आहे, ज्यांचं नाव आहे सोमनॅमबुलीझम अवस्था. या अवस्थेत व्यक्तीच्या मनातील विचार क्रियाकलाप नाहीसा होतो. मन शून्य अवस्थेला पोहचते. संमोहन अवस्थेतील व्यक्ती समाधीची उच्चतम अवस्थेला पोहचतो, असं मानलं जातं. संबंधित संमोहित व्यक्तीचे सिक्स सेन्स ॲक्टीव्ह होतात. अशा अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीस (प्रयुक्तास) कोणत्याही व्यक्तीबाबत संमोहनकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांची व समस्यांची उत्तरे त्या अवस्थेत त्यास दिसू लागतात. संबंधित सांगितलेल्या उत्तरांची अनेकदा पडताळणी सुद्धा करता येते. या अवस्थेत प्रश्न व समस्यांची अचूक उत्तरे मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अधिक संशोधन, विकास, मान्यतेची गरज आहे.