मन, बुद्धी, शरीर यामधील असंतुलन- अपयश, दुःख व आजार यास कारणीभूत
(व्यक्तीला जीवनात पाहिजे तेवढा आत्मविश्वास व पाहिजे तेवढी एकाग्रता साधता आली तर व्यक्ती जीवनातील कितीही मोठं ध्येय साध्य करु शकतो. त्यासाठी काय करावे? ते जाणून घ्या.)
- अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं, भरपूर अभ्यास करावा, चांगली मार्क्स मिळावावीत. लठ्ठ व्यक्तीला वाटतं असतं, भरपूर व्यायाम करावा- डायट करावं. प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला वाटतं असतं, आळस झिडकारून या क्षेत्रात अधिक परिश्रम घेऊन पुढं जावं, अधिक सराव करुन स्वतः ला अधिक परफेक्ट बनवावं, आत्मविश्वासाने माझं नॉलेज सिनियर समोर मांडावं, प्रभावी प्रेझेंटेशन करावं. प्रत्येक पैलवान-खेळाडूला वाटतं, अधिक व्यायाम करावा, प्रॅक्टीस करावी. अनेक तरुणांना वाटतं, सलमान खान सारखी बॉडी बनवावी. प्रत्येक व्यक्तीला जीवनात बरंच काही करण्याची मनोमन तीव्र इच्छा असते. परंतु ते करु शकत नाहीत. कारण त्यांची इच्छा असते. परंतु त्यांना मनाची साथ मिळत नाही. मन फक्त कारणं सांगत राहत. वेळ पुढं-पुढं ढकलत नेत. असंच व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. याच कारणांमुळे लोकांच्या अनिवार्य इच्छा सुद्धा एक स्वप्न बनून राहतात. परंतु जे लोक या गोष्टी करतात, ते लोक जीवनात भरपूर यश, आत्मसन्मानाचं जीवन प्राप्त करतात. तुमच्या इच्छेला मनाची साथ व मनाचं बळ मिळण्यासाठी हिप्नोथेरपी तुम्हाला कशी मदत करु शकते? हिप्नोथेरपी कशी तुमची स्वप्ने साकार करु शकते? याच विश्लेषण आपण पुढे पाहणारच आहोत.
- मानसिक समस्या निर्माण झाल्यानंतर, अनेकांना वाटत, काळजी करु नये, टेंशन घेऊ नये, घाबरु नये, चिंता करु नये, नकारात्मक विचार करु नये, ओव्हरथिंकींग करु नये, वाईट विचार करु नये, स्वतः ला कमी समजू नये. अशावेळेस ही मन तुम्हाला साथ देत नाही. तुम्ही जेवढं नकारात्मक विचार करायचा नाही म्हणाल, तेवढे जास्त नकारात्मक विचार येत जातात. तुम्ही जे रोखण्याचा प्रयत्न कराल त्याच्या उलट (विरुद्ध) मनामध्ये अवरोध होऊ लागतो. व्यक्तीची इच्छा असते. विविध समस्येमधून बाहेर पडण्याची, परंतु मनाची साथ व्यक्तीला मिळत नाही. मानसिक ताणांमुळे शरीरातील सर्व नसा, संस्था, स्नायू, इंद्रिय, अवयव इ. ताण येऊन-येऊन संबंधित बाबींची कार्यक्षमता, ताणांमुळे दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे असे शारीरिक आजार वर्षानुवर्षे गोळ्या-औषधाने बरे होत नाहीत. हिप्नोथेरपीच्या मदतीने असे शारीरिक आजार जादू सारखे बरे होऊ लागतात, असे आमच्याकडे शेकडो रिझल्ट आहेत.
- व्यक्तीचं मन, बुद्धी व शरीर यास आपण समजून घेऊ….आपण बऱ्याचदा म्हणतो, मी आणि माझं मन, तो आणि त्याचं मन. माझं मन माझ्या ताब्यात नाही. त्याच मन त्याच्या ताब्यात नाही. मला कळतंय पण वळत नाही. प्रश्न असा आहे की, कळतंय कुणाला अन् वळत नाय कुणाला? मी कोण आहे? माझं मन कोण आहे? नक्कीच मी आणि माझं मन या दोन्ही बाबी स्वतंत्र पणे कार्य करतात. मी म्हणजे आपली बुद्धी – आपलं बाह्यमन(कॉन्सियस माईंड). जे तर्क करते. वितर्क करते. चांगलं काय-वाईट काय? योग्य काय-अयोग्य काय? चुकीच काय-बरोबर काय? फायद्याचं काय-नुकसानाचं काय? याचा निर्णय घेते. यालाच आपली तर्कबुद्धी म्हणतात. अन् ज्याला आपण माझं मन म्हणतो, ते मन म्हणजे आपलं अंतर्मन (सबकॉन्सियस माईंड). या मनात(अंतर्मनात) व्यक्तीचे स्वभाव, सवयी, वर्तन, विचारांची दिशा रुजलेल्या असतात. यालाच व्यक्तीच व्यक्तिमत्त्व म्हटलं जातं. परंतु दोन सख्ख्या भावाचे तरी स्वभाव एकसारखे असतात का? अजिबात नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या धारणा, बिलीफ सिस्टीम(विश्वास प्रणाली), इमोशन(भावना), दृष्टिकोन वेगवेगळे असतात. या बाबी प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सॉफ्टवेअरच काम करतात. व्यक्ती स्वतःच विचार बदलू शकतो. परंतु तो स्वतःच्या धारणा, भावना बदलू शकत नाही.
- उदा.
- विद्यार्थ्यांची बुद्धी म्हणते, ‘हे वर्ष खुप महत्वाचं आहे, भरपूर अभ्यास केला पाहिजे, चांगली मार्क्स मिळावले पाहिजेत. वर्गात पहिला-दुसरा-तिसरा नंबर आला पाहिजे, एवढा अभ्यास करायचा’. मग तो ठरवतो, ‘उद्यापासून अभ्यास चालू करायचा, उद्या पासून अभ्यास चालू करायचा, उद्या पासून अभ्यास चालू करायचा’. परंतु रोज त्याचं मन काहीतरी कारण सांगून – सांगून ती वेळ पुढं ढकलत नेत. विद्यार्थ्यांची इच्छा असते परंतु मन त्यास तयार होत नाही. असं करत-करत वर्ष निघून गेलं तरी त्याचा उद्या काही येत नाही. अशी अनेक मुलं इच्छा असूनही, मनाने त्यांना साथ न दिल्याने, ते अभ्यासात प्रगती करु शकत नाहीत. ज्यामुळे ते जीवनात पुढे जाऊन अपयशी ठरतात. आता ठिकाणी खेळाडू असो, नोकरदार असो, कलाक्षेत्रातील कोणी असो, लठ्ठ व्यक्ती असो, व्यवसायिक असो, राजकारणी असो…. यापैकी प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, मोठी झेप घेण्यासाठी बरंच काही करायचं असतं. परंतु मनाची साथ न मिळाल्याने, व्यक्ती जीवनात अपेक्षित यश प्राप्त करु शकत नाहीत. तुमच्या मनाला तुमचा मित्र व सारथी बनविण्यासाठी हिप्नोथेरपी तुमच्या साठी वरदान ठरते.
- तुम्हाला धावण्यासाठी, उडी मारण्यासाठी, बुक्का मारण्यासाठी, गोळा फेक करण्यासाठी, फायटींग करण्यासाठी, कुस्ती खेळण्यासाठी तुमचं मनच तुमच्या शरीराला बळ देण्याचं काम करत असतं. जर तुमचं मन घाबरलं, नकारात्मक झालं तर तुम्ही कोणतीच गोष्ट सक्षमपणे करू शकत नाही. तुमच्या मनाचा आत्मविश्वास थोडा कमी झाला, तुमच्या मनात डाऊट(शंका) आला तर तुम्ही पुढच्याला हारवू शकत नाही. तुमचा जेवढा आत्मविश्वास कमी होईल, तेवढं तुमचं शारीरिक बळ कमी होईल. आत्मविश्वास वाढेल त्याप्रमाणात तुमच्या शरीरच बळ वाढतं जात. मी संमोहन उपचाराद्वारे हजारो लोकांना त्यांच्या जुनाट व असाध्य शारीरिक आजारातून जादू सारखे बरे केले आहेत. याच वेबसाईट वर त्यांचे भरपूर अविश्वसनीय रिझल्ट तुम्ही पाहू शकता. यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं मनच तुमच्या शरीराला बळ प्रदान करु शकतं. इतर कोणाच्याही आवाक्यातील गोष्ट नाही.
- अर्थात हिप्नोथेरपी तुमच्या मनाला बळ देऊ शकते. अन् तुमचं तुमच्या शरीराला बळ प्रदान करु शकतं.
- हुशार विद्यार्थ्याला, यशस्वी व्यक्तीला, निरोगी माणसाला, आनंदी मनुष्याला व्यक्तीचं मनचं साथ देत असतं. मनच व्यक्तीला बळ देत असतं.
- हिप्नोथेरपी तुम्हाला हुशार व ॲक्टीव्ह विद्यार्थी, सक्षम व मजबूत व्यक्ती, एक निरोगी शरीर, इतरांपेक्षा अधिक क्षमतावान पैलवान – खेळाडू, कामजीवनातील योद्धा, विशेष कार्यक्षमता असणारा व्यक्ती, नोकरदार, व्यवसायिक, उद्योजक, राजकारणी बनवू शकते. तुमच्या अंतरंगातील मानसिक, बौद्धिक व शारिरीक क्षमता अनेक पटीने विकसित करु शकते. तुमच्या जीवनातील स्वप्नांना साकार करण्यास तुम्हाला विशेष मदत करु शकते. हिप्नोथेरपी तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकते. सुधारणा करु शकते. परीवर्तन घडवून आणू शकते.